पुणे- महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना आज दुपारी जाहीर होताच कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी काही झोपडपट्ट्यां तोडून त्या २ प्रभागात विभागल्यात , कुठेही भौगोलिकदृष्ट्या समता पाळली गेलेली नसल्याचा आरोप करत कॉंग्रेस यावर हरकती नोंदविणार असल्याचे म्हटले आहे तर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अत्यंत सुरेख प्रभाग रचना म्हणत आम्ही स्वबळावर १२२ जागा जिंकू शकतो असे वक्तव्य केले तर भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुलीक, आणि गणेश बिडकर यांनी ‘अब कि बार , सौ पार … असा नारा दिला आहे आणि मनसे ने तर आज प्रभाग रचना करताना राष्ट्रवादीचे हित डोळ्यापुढे ठेऊन च प्रभाग रचना केल्याचा आरोप करत यात मोठे गैर प्रकार झाल्याचा ठपका ठेऊन महापालिकेत आंदोलन करत घोषणाबाजी केली. शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे यांनी देखील कुठल्यातरी एका पक्षाचा वरचष्मा राहील अशा पद्धतीने तोडमोड करत भौगोलिक ताळमेळ न ठेवता प्रभाग रचना केल्याचा आरोप केलाय आणि यावर हरकती नोंदविणार असल्याचे म्हटले आहे.
काहीही केले तरी कॉंग्रेसला जनता आता स्वीकारेल आणि महापालिकेत चार पाच पटींनी आमची ताकद वाढेल ,आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वीच काँग्रेस स्वबळावर लढणार असे सांगितल्याने तीन महिन्यांपासून आमची तयारी सुरू आहे. असे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले.भौगोलिक असमतोल असलेला प्रभागांचा आराखडा असल्याने काँग्रेस हरकती नोंदविणार असे ते म्हणाले. महागाई, बेरोज़गारी ने त्रस्त झालेली जनता, भ्रष्टाचाराचा भाजपने गाठलेला कळस हे जनतेच्या मनातून दूर होऊ शकणार नाही, कोरोना काळात केलेल्या व्यवहाराची श्वेत पत्रिका काढा अशी आमची मागणी कायम आहे, येत्या 5 तारखेला असंख्य कार्यकर्ते प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस मध्ये प्रवेश करतील, एकला चलोरे चा आमचा नारा आहे. त्या दृष्टीने काँग्रेसची तयारी पूर्ण होते आंहे, जनता यावेळी भाजपने स्वप्ने दाखवून केलेल्या विश्वासघाताबद्दल भाजपला निश्चित धड़ा शिकवेल.असेही बागवे म्हणाले .
गेल्या काही महिन्यांपासून आघाडीची भाषा करणाऱ्या राष्ट्रवादीने आता थेट स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केल्याने महाविकास आघाडीमध्ये पुण्यात तरी ऑल इज वेल नसल्याची प्रचीती आली आहे .महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना राष्ट्रवादी काँग्रेससाठी अनुकूल असल्याचा दावा आज राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला .
प्रभाग रचनेचे स्वागत करताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यंदाच्या निवडणुकीत १२२ नगरसेवक निवडून येतील असा दावाही त्यांनी पत्रकार परिषदेत केला.जगताप म्हणाले, निवडणूक आयोगाने पारदर्शकपणे व नियमानुसार प्रभाग रचना तयार केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला १२२ जागा मिळतील. ही प्रभाग रचना राष्ट्रवादीसाठी पूरक असल्याने ही निवडणूक स्वबळावर लढवावी अशी माझी इच्छा आहे. यासाठी पुढील तीन दिवसात शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. मात्र, महापालिका निवडणुकीत आघाडी करायची की नाही याचा अंतिम निर्णय पक्षाचे नेते घेतली. आघाडीसाठी शिवसेनेसोबत चर्चा झाली असली तरी ती प्राथमिक आहे, त्यात कोणताही निर्णय झालेला नाही. भविष्यात आघाडी झालीच तर राष्ट्रवादी काँग्रेस १७३ पैकी ११० जागांच्या खाली येणार नाही. भाजपसह इतर पक्षातील १६ नगरसेवक राष्ट्रवादीत येणार आहेत, असेही जगताप यांनी सांगितले.आम्हाला काही फरक पडत नाही – शिवसेनामहापालिका निवडणुकीत आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादीनेच आम्हाला दोन वेळा बैठकीला बोलविले होते. पण त्यांना आता आघाडी करायची नसले तर आम्हाला काही फरक पडत नाही. सर्व जागा ताकदीने लढण्याची आमची तयारी आहे. नगरपंचायतीच्या निवडणुकीत यश मिळाल्याने प्रशांत जगताप यांची भूमिका बदलली असेल, पण आम्ही आघाडी करताना आम्ही कायम सतर्कच आहोत, असे शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी सांगितले.

