छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. त्यांचे समर्थ नेतृत्व आणि सामाजिक कल्याणावर त्यांनी दिलेला भर पिढ्यानपिढ्या लोकांना प्रेरणा देत आहे,असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे
आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;
छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंती निमित्त मी नमन करतो. त्यांचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व आणि समाज कल्याणाचा आग्रह अनेक पिढ्यांसाठी प्रेरक ठरला आहे. सत्य आणि न्यायाच्या बाजूने उभे रहाताना त्यांनी कोणतीही तडजोड केली नाही. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.

