पुणे- महात्मा गांधी जयंतीनिमित्त पुणे शहर काँग्रेसच्या वतीने ‘‘संवाद यात्रेचे’’ आयोजन करण्यात आले होते खंडोजी बाबा चौक येथून सुरू झालेली यात्रा आदमबाग येथील कै. काकासाहेब गाडगीळ यांच्या पुतळ्याजवळ या संवाद यात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी बोलताना शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘प.पू. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये देशातील सर्व क्षेत्रातील बंधू – भगिनींना निरनिराळ्या उपक्रमांच्या माध्यमातून जोडण्याचे काम करून तिरंगा झेंड्याखाली स्वातंत्र्यलढ्यामध्ये सहभागी करून घेतले. आज खासदार राहुल गांधी हे कन्याकुमारी ते काश्मिरपर्यंत पदयात्रा काढून ‘भारत जोडो’ अभियान राबवित आहे. त्यांच्या समर्थनार्थ ह्या संवाद यात्रेचे आयोजन केले आहे. आजच्या पिढीला व्हॅट्सॲप युनिव्हरसिटीच्या माध्यमातून चूकीचा इतिहास सांगण्याचे षडयंत्र महात्मा गांधींच्या खुन्यांनी रचले आहे. त्यामुळेच गांधीजी आणि भगतसिंग, गांधीजी आणि आंबेडकर, गांधीजी आणि सरदार पटेल, यांच्या नावाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बदनामीचा कट रचला जात आहे. ही संवाद यात्रा या सर्व खोट्या व चूकीच्या इतिहासाला छेद देण्यासाठी काढण्यात आलेली आहे.’’ यानंतर अंधश्रध्दा निर्मुलनचे श्रीपाल ललवाणी, कामगार संघटनेचे नितीन पवार, मराठा सेवा संघाचे राजेंद्र कुंजीर, लोकायतचे निरज जैन, ॲड. अभय छाजेड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बाळासाहेब शिवरकर, दिप्ती चवधरी, आबा बागुल, वीरेंद्र किराड, कमल व्यवहारे, चंदूशेठ कदम, अविनाश बागवे, रफिक शेख, अजित दरेकर, सुजाता शेट्टी, विनोद मथुरावाला, पुजा आनंद, संगीता तिवारी, मुख्तार शेख, द. स. पोळेकर, उस्मान तांबोळी, चेतन आगरवाल, प्रा.वाल्मिक जगताप, मनोहर गाडेकर, सतिश पवार, प्रविण करपे, भुतडा, सचिन आडेकर, यशराज पारखी, शाबीर खान, सुरेश काबंळे, अरूण वाघमारे, उमेश कंधारे, गोपाळ तिवारी, रजनी त्रिभुवन, मीरा शिंदे, विनोद रणपिसे, विनय ढेरे, प्रकाश पवार, सुजीत यादव, शिलार रतनगिरी, सौरभ अमराळे, राहुल तायडे, भगवान कडू, विनय ढेरे, बंडू नलावडे, आदींसह असंख्य कार्यकर्ते सवांद यात्रेत सहभागी होते. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष अरविंद शिंदे व ॲड. अभय छाजेड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त काँग्रेसची ‘‘संवाद यात्रा ‘ संपन्न
Date:

