Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

क्रांती दिनाच्या पूर्व संध्येला ‘क्रांतीज्योत’ यात्रा काढून पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहिदांना अभिवादन.

Date:

पुणे-

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘व्‍यर्थ न हो बलिदान’ कार्यक्रमाअंतर्गत ९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या पूर्व संध्येला पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन ते गोपाळकृष्ण गोखले चौक (गुडलक चौक) पर्यंत ‘क्रांतीज्योत यात्रा’ काढून शहिदांना अभिवादन करण्यात आले.

      क्रांतीज्योत यात्रेच्या गोपाळकृष्ण गोखले चौक (गुडलक चौक) येथे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून समारोपीय भाषणात माजी आमदार उल्हास पवार म्हणाले की, ‘‘काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. १९४० ला वर्ध्याच्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पूर्ण स्वराज्याचा विषय मांडण्यात आला त्यानुसार १९४२ च्या मुंबईला झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये छोडो भारत आंदोलनाचा ठराव संमत झाला. महात्मा गांधीच्या चले जाव या घोषणेमुळे लाखो सत्याग्रही देशाच्या विविध भागात ब्रिटीश साम्राज्याच्या विरोधात चले जाव चे आंदोलन करायला लागले. त्यावेळेस लाखो देशवासियांच्या मनात एकच ध्येय होते की भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे. काकासाहेब गाडगील, शंकरराव मोरे, केशवराव जेधे, पं. नेहरूंसह अनेक सहकाऱ्यांनी या देशाची रखवालदारी केली आहे. काँग्रेसने या देशामध्ये अखंडत्व, सार्वभौमत्व ठेवले याचे स्मरण देशवासियांनी करायला पाहिजे. पं. जवाहरलाल नेहरूंची एकतेची, अखंडतेची परंपरा त्यांच्या मुलीने, नातवाने अखंडपण चालू ठेवली याचे स्मरण करणे गरजेचे आहे. मी सर्वांना आवाहन करतो की, सुडाची भावना न ठेवता हा देश अखंड राहिला पाहिजे. आज या देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाची सुरूवात १५ ऑगस्ट रोजी होणार असून या ठिकाणी मी त्या लाखो हुतात्म्यांना शतश: प्रणाम करून आदरांजली अर्पण करतो.

      यावेळी मोहन जोशी, आबा बागुल,अरविंद शिंदे,ॲड. अभय छाजेड,  कमल व्‍यवहारे, दिप्ती चवधरी, नीता रजपूत, अजित दरेकर, रविंद्र धंगेकर,संजय बालगुडे, दत्ता बहिरट, लता राजगुरू, वैशाली मराठे, रफिक शेख, बाळासाहेब दाभेकर, शेखर कपोते, राजेंद्र शिरसाट, रमेश अय्यर, साहिल केदारी, सुधीर काळे, सोनाली मारणे, सचिन आडेकर,सतीश पवार, यासीन शेख, विठ्ठल गायकवाड, नितीन परतानी, सुनिल पंडित, चैतन्य पुरंदरे, अनंतराव गांजवे, विजय खळदकर, सुजित यादव, शिलार रतनगिरी, भरत सुराणा, हरिदास अडसूळ, लतेंद्र भिंगारे, सुमित डांगी, अविनाश अडसूळ, साहिल राऊत, देविदास लोणकर, स्वाती शिंदे, डॉ. वैष्णवी किराड, मनोहर गाडेकर, क्लेमेंट लाजरस, रॉर्बट डेव्‍हिड, राजेंद्र भुतडा, सतिश पवार, प्रविण करपे, शोएब इनामदार, रमेश सकट, सुनिल घाडगे, रमेश सोनकांबळे, सौरभ अमरळे, राहुल तायडे, बाबा नायडू, अण्णा राऊत, फय्याज शेख, विजय वारभुवन, कविराज संघेलिया, गणेश शेडगे, योगेश भोकरे, सुरेश कांबळे, सेल्वराज ॲथोनी, अजित जाधव, कविराज संघेलिया, विश्वास दिघे, बबलू कोळी, परवेज तांबोळी, नंदलाल धिवार, घन:शाम निम्हण, विक्रम खन्ना, अरुण वाघमारे, सुंदरा ओव्‍हाळ, नलिनी दोरगे, ताई कसबे, रजिया बल्लारी, किरण मात्रे आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शीतल तेजवानीचा आता थेट रणबीर कपूरवर निशाणा!

पुणे-कोरेगाव पार्क , मुंढवा येथील गाजलेल्या 40 एकराच्या सरकारी...

पार्थ अजित पवारांचा जमीन घोटाळा:शीतल तेजवानीने लपवून ठेवलेले दस्त अखेर जप्त

पुणे- कोरेगाव पार्क मुंढवा येथील सरकारी जमीन लाटण्यासाठी...

“त्या” विमान प्रवाश्यांना भरपाई दिलीच पाहिजे: मुंबई युवक काँग्रेसचे आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या T2 टर्मीनलवर घोषणाबाजी करत...