पुणे-जेजुरीच्या खंडोंबा गडावर जाण्यासाठी प्रस्तावित मोनो रेल्वे प्रकल्पाची लवकरात लवकर उभारण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते हेमंत बाजीराव मुळे यांनी केली आहे .जेजुरीचा खंडोबा हे अठरापगड जातीचे दैवत आहे . गोरगरीब सर्वसामान्य दैवत म्हणून याची ओळख आहे . खंडोबा गडावर जाण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते . जेजुरीचा ऐतिहासिक गड पाहण्याची अनेक भाविकांना व पर्यटकांना इच्छा असते . परन्तु गडाला ४५० पायऱ्या चढणे व उतरणे शक्य होत नाही , अशा भाविकांना मोनो रेल्वे द्वारे गडावर जाता येईल . मोनो रेल्वेमुळे गडावर वाहनेसुध्दा कमी जातील .
हा प्रकल्प बी. ओ. टी. तत्वावर उभारण्याचे आघाडी सरकारने निर्णय घेतला होता . तत्कालीन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आग्रहाची भूमिका घेतली होती . तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण ,तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकल्प उभारणीसाठी विशेष प्रयत्नशील होते . या प्रकल्पामध्ये शासनाची २८ टक्के गुंतवणूक करण्याचे ठरविण्यात आले होते . खंडोबा गडावर दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात . यातील ४० ते ४५ टक्के भाविकांना गड चढतानाचा त्रास होतो . यांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रस्तावित मोनो रेल्वे प्रकल्पाची लवकरात कवकर उभारण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते हेमंत बाजीराव मुळे यांनी केली आहे .
यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील , पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट व पुरंदर विधानसभेचे आमदार व राज्याचे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांच्या प्रयत्नांतून जेजुरीच्या खंडोंबा गडावर जाण्यासाठी प्रस्तावित मोनो रेल्वे प्रकल्प उभार राहू शकेल .