पुणे : कसबा गणपती मंदिरासमोर घंटानाद आंदोलन केल्याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड चे आमदार चंद्रकांत पाटील आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत या आंदोलनात सहभागी झालेल्या 30 ते 40 भाजप कार्यकर्त्यांवर देखील गुन्हा दाखल झाला आहे. कसब्या च्या आमदार आणि माजी महापौर मुक्ता टिळक भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक,महापालिकेतील सभागृहनेते गणेश बिडकर , प्रवक्ते संदीप खर्डेकर , राजेश पांडे,आदी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते .
आंदोलनावेळी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून फरासखाना पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भाजपने काल सायंकाळच्या सुमारास पुण्यातील प्रसिद्ध कसबा गणपती मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करत राज्यातील मंदिरे उघडी करण्यासाठी सरकार विरोधात हे आंदोलन केले होते.

