रेल्वे पोलीस दल, पश्चिम विभागाच्या वतीने हिरवा झेंडा दाखवून दुचाकी रॅली साबरमतीकडे रवाना

Date:

मुंबई, 19 जुलै 2022

स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून,  पश्चिम रेल्वेने  आज, 19 जुलै 2022 रोजी पश्चिम रेल्वे मुख्यालयातून हिरवा झेंडा दाखवत मोटरसायकल रॅली आणि ‘रन फॉर युनिटी’ मोहिमेला प्रारंभ केला. या रॅलीमध्ये पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, वडोदरा, अहमदाबाद, रतलाम, भावनगर आणि राजकोट या सर्व सहा विभागातील रेल्वे पोलीस दलाच्या (आरपीएफ ) कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

(नरेश लालवानी, पश्चिम रेल्वेचे  वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, पी.सी . सिन्हा, पश्चिम रेल्वेचे  प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त, पश्चिम रेल्वेच्या  मुख्यालयातून मोटरसायकल रॅली आणि रन फॉर युनिटीला हिरवा झेंडा दाखवताना)

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर, पश्चिम रेल्वेचे  वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक नरेश ललवानी आणि पश्चिम रेल्वेचे  प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त, पी.सी . सिन्हा  यांनी रेल्वे पोलीस दलाच्या  मोटरसायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवला.  महात्मा गांधी यांनी ज्या  साबरमती आश्रमापासून प्रसिद्ध दांडी  यात्रेला सुरुवात केली होती त्या ऐतिहासिक  साबरमती आश्रमापर्यंत या  रॅलीला पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयातून हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.

25 दुचाकींवर पश्चिम रेल्वेच्या रेल्वे पोलीस दलातील(आरपीएफ) 50  कर्मचारी  स्वार झाले असून या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत. ही रॅली संजन, वलसाड, बिलीमोरा, नवसारी, सुरत, अंकलेश्वर, वडोदरा मार्गे साबरमती आश्रमात पोहोचेल.1 जुलै 2022 रोजी, पश्चिम रेल्वेच्या  सर्व विभागीय मुख्यालयातून मोटार सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला, यात मुंबई, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील पश्चिम रेल्वेच्या  कार्यक्षेत्रातील 75 महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचा समावेश होता. त्यानंतर ही  रॅली पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात पोहोचली.

पश्चिम रेल्वेच्या  रेल्वे पोलीस दलातील  6500 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी  सर्व विभागांमध्ये ‘रन फॉर युनिटी’ मध्ये सहभाग  घेतला असून त्यांनी  18,600 किमी पेक्षा जास्त अंतर कापले आहे, अशी  माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली. 1 ऑगस्ट 2022 रोजी साबरमती आश्रमामधून पुढे ही  दुचाकी  रॅली निघेल आणि या मार्गावरील महत्त्वाच्या शहरांमधून ही रॅली 14 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय पोलीस स्मारकात पोहोचेल आणि समारोप समारंभात सहभागी होईल., असे पश्चिम रेल्वेच्या  मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘स्वातंत्र्याची रेल्वेगाडी आणि स्थानके ’हा आयकॉनिक सप्ताह

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून, भारतीय रेल्वे 18 ते 23 जुलै 2022 या कालावधीत 75 स्थानके आणि 27 रेल्वेगाड्यांमध्ये “स्वातंत्र्याची रेल्वेगाडी आणि स्थानके” हा आयकॉनिक  सप्ताह साजरा करत आहे.या विशेष गाड्या आणि स्थानके भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या गौरवशाली इतिहासाशी संबंधित महत्त्वाची ठिकाणे आणि घटना दर्शवतात.या अनुषंगाने,पश्चिम रेल्वे या महोत्सवाच्या सप्ताहाच्या उत्सवात मोठ्या उत्साहात सहभागी होत आहे.भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या विविध टप्प्यांमध्ये राष्ट्रीय महत्त्व असलेल्या पोरबंदर, साबरमती, नवसारी, अडस   रोड आणि बारडोली या पश्चिम रेल्वेच्या स्थानकांची यासाठी निवड करण्यात आली आहे . त्याचप्रमाणे,पश्चिम रेल्वेच्या 9 गाडयांना  उदा. लोकशक्ती एक्सप्रेस, आश्रम एक्सप्रेस, साबरमती एक्सप्रेस, अहिंसा एक्सप्रेस, नवजीवन एक्सप्रेस, शांती एक्सप्रेस, गुजरात मेल, अहमदाबाद – नवी दिल्ली स्वर्ण जयंती राजधानी एक्सप्रेस आणि वांद्रे टर्मिनस – सूरत इंटरसिटी एक्सप्रेसला स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य विविध स्थानकांवरून हिरवा झेंडा दाखवतील.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...