पुणे – आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून कोथरुडकरांची दिवाळी गोड होणार असून, अतिशय नाममात्र दरात दिवाळी फराळ उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याला कोथरुडकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

कोरोनावर नियंत्रणासाठी देशात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर श्री. पाटील यांनी आपल्या मतदारसंघात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले होते. यामध्ये अतिशय नाममात्र शुल्क आकारुन पोळी-भाजीची व्यवस्था करणे, वयोवृद्धांना २५% सलवतीच्या दरात औषधे देणे. त्याबरोबरच हॅंड सॅनिटायझर, मास्क, अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या वाटप यासारखे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले होते. त्याच धर्तीवर कोथरुडकरांची दिवाळी गोड करण्यासाठी श्री. पाटील यांनी पुढाकार घेतला असून, १०० रुपये इतके नाममात्र शुल्क आकारुन दिवाळी फराळ उपलब्ध करून दिला आहे.
श्री. पाटील यांच्या कोथरुड मधील जनसंपर्क कार्यालयात याची व्यवस्था करण्यात आली आहे. शुक्रवार दिनांक ६ नोव्हेंबर ते मंगळवार दि. १० नोव्हेंबर दरम्यान दुपारी ३ ते ६ या वेळेत फराळ विक्री होणार आहे. याला कोथरुडकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

