पुणे- ‘डॉक्टर डे’च्या निमित्ताने कॉंग्रेसच्या वतीने आरोग्य सेवकांचा सन्मान करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली .जागतिक डॉक्टर दिनाच्या निमित्त भवानी पेठेतील मनपाचे सोनवणे हॉस्पिटल येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .
यावेळी सोनवणे रुग्णालयाचे मुख्य इन्चार्ज डॉक्टर माधुरी रोकडे यांचा सन्मान माजी गृहराज्यमंत्री पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अमित देशमुख व प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्रक यावेळी डॉक्टर सेल यांच्या वतीने देण्यात आले.
यावेळी रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस व स्टाफ यांचा देखील सत्कार करण्यात आला. यामध्ये एन.आय.सी.यु. विभागाचे प्रमुख डॉक्टर चव्हाण, डॉ . स्मिता गौड व इतर डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये अविनाश बागवे, सुनील बावकर, हुसेन शेख , रवी पाटोळे , व इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच तेथील डायलेसिस सेंटरची देखील पाहणी बागवेच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर सेल चे डॉक्टर वैष्णवी किराड व स्थानिक नगरसेवक अविनाश रमेश बागवे यांनी केले होते
‘डॉक्टर डे’कॉंग्रेसच्या वतीने आरोग्य सेवकांचा सन्मान करून कृतज्ञता व्यक्त
Date:

