पुणे दि.2: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वनविभागामार्फत टेकडी संवर्धनाच्या दृष्टीने व नागरिकांमध्ये निसर्गाविषयी आवड निर्माण होण्यासाठी पुणे शहर परिसरातील टेकड्यांवर 4 व 5 जून रोजी स्वयंसेवी संस्था, पर्यावरणाविषयी आवड असणारे नागरिक, विविध टेकडी गृप यांच्या लोकसहभागातून स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी दिली.
4 जून रोजी हनुमान टेकडी, म्हातोबा टेकडी, वेताळ टेकडी, मोहमंदवाडी, वानवडी येथील टेकडी व 5 जून रोजी वारजे, हिंगणे, तळजाई, सिंहगड, बावधन, घोराडेश्वर येथील टेकडी परिसरात लोकसहभागातून स्वच्छता मोहिम सकाळी 7 ते 9 या वेळेत राबविण्यात येणार आहे. सहभाग नोंदविण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी, पुणे, भांबुर्डा व नोंदणीसाठी ९८३४५२८०३० या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
पुणे शहर परिसरातील वनविभागाचे अधिनस्त असणाऱ्या टेकडीवर स्वच्छता मोहिम महिन्यातून एकदा पहिल्या शनिवारी लोकसहभागातून उस्फूर्तपणे सामाजिक संस्था व इतर सेवाभावी संस्थाच्या सहभागाने राबविण्यात येणार आहे. नागरिक, स्वयंसेवी संस्था, विविध टेकडी गृप यांनी या मोहिमेत उस्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन उपवनसंरक्षक श्री. पाटील यांनी केले आहे

