पुणे : भारतात वाहतुकीसाठी सर्वात लोकप्रिय असलेल्या ओला अॅपने, पुणे वाहतूक पोलिसांबरोबर हातमिळवणी केली असून, शेअर राइड वापरून वाहतूक कोंडी कमी करावी आणि प्रदूषणात घट करावी यासाठी लोकांमध्ये जागरूकता करावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जागरूकता उपक्रमाचा भाग म्हणून ज्येष्ठ वाहतूक पोलीस अधिकारी हजारो प्रवाशांना शहरातील प्रमुख वाहतूक ठिकाणी रोपटी देत आहेत, याद्वारे लोकांनी राइड शेअर करावी, जेणेकरून रस्त्यांवरील कोंडी कमी होईल आणि एकूण प्रदूषणात घट होण्यास मदत होईल, असा संदेश देण्यात आला.
पुण्यात प्रत्येक दिवशी साधारण शेकडो वाहनांची नोंदणी होते, तसेच वाढत्या लोकसंख्येमुळे रस्ते पायाभूत सुविधांवर ताण येत आहे, परिणामी शहरात वाहतूक कोंडी वाढते आहे. स्मार्ट आणि शेअर वाहतूक उपाययोजनांमुळे वाहतूक कोंडी कमी शकते आणि प्रदूषणातही घट होऊ शकते.
यंदा जागतिक पर्यावरणदिनी, ओलाने अनोख्या #FarakPadtaHai (फरक पडता है) या कँपेनचे उद्घाटन केले, वाहतूक कोंडी कमी करणे आणि देशात शेअर राइडचे महत्त्व पोचवणे हे याचे ध्येय आहे. ओलाच्या उपक्रमाचा भाग म्हणून शहरातील वाहतूक पोलिसांच्या पाठिंब्याने शाश्वत वाहतूक उपाययोजनेचे महत्त्व लोकांपर्यंत पोचवणार आहे आणि लोकांना राइड शेअर करण्यासाठी प्रोत्साहित करणार आहे, यासाठी शहरातील वाहतुकीच्या प्रमुख ठिकाणी प्रवाशांशी संवाद साधला जाणार आहे. मुंबईशिवाय अशाच प्रकारचा उपक्रम दिल्ली, नोएडा, गुरगाव, बंगळुरू आणि पुणे येथेही राबवण्यात येणार आहे.
ओलाचे सीओओ विशाल कौल म्हणाले की, “आमची #फरक पडता है कँपेन देशभर राबवताना आम्ही अतिशय़ उत्सुक आहोत. शेअर वाहतुकीचा पर्याय लाभदायक आहे णि यामुळे वाहतुकीचा प्रश्न आणि प्रदूषण दोन्ही स्मार्ट आणि शाश्वत मार्गांनी सुटणार आहेत. आपल्या शहरात वाहतूक अतिशय मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. आता मात्र शेअर वाहतुकीचा पर्याय निवडण्याची हीच योग्य वेळ आहे. ओला शेअरद्वारे आम्ही सातत्याने नवीन कँपेन चालवत आहोत, यात नावीन्यपूर्णता आणि उपक्रम यांचाही समावेश आहे, कार्बन उत्सर्जन, इंधनातील बचत, वाढती वाहतूक समस्या आणि यासंदर्भात योग्य क्रिया यांना चालना देण्याच्या दिशेने हा उपक्रम कार्यरत आहे.”
ते पुढे म्हणाले की, “आम्ही वाहतूक पोलीस विभागाचे आभारी आहोत, त्यांचा भक्कम पाठिंबा आम्हाला लाभलेला आहे.”
यानिमित्ताने पुण्याचे वाहतूक विभागाचे डीसीपी श्री. अशोक मोराळे म्हणाले की, “पुणे शहरात रोजच्या रोज शेकडो वाहनांची नोंदणी होत असते, याचाच परिणाम म्हणजे वाहतूक आणि हवेचे प्रदूषण यांत कमालीची वाढ होत आहे. यापूर्वी यावर उपाय म्हणून आम्ही सार्वजनिक वाहने वापरण्याविषयी सांगत होतो, परंतु ओलासारख्या खासगी कंपन्यांनी राइड शेअर करण्यासाठी पुढे येऊन प्रोत्साहन देणे ही कौतुकास्पद बाब आहे. शेअर वाहतूक उपाययोजना रस्त्यावरील वाहनांची गर्दी टाळण्यासाठी आणि प्रदूषणात घट करण्यासाठी मदतच करतील.”
ओलाच्या #फरक पडता है या अनोख्या कँपेनचे ध्येय ग्राहकांनी ओला शेअर वापरावे आणि गर्दी आणि देशातल्या प्रमुख शहरातील कोंडी टाळण्याविरोधात उभे राहावे हे यासाठी प्रोत्साहन दिले जाते. निपुण क्रिकेटर विरेंदर सेहवाग यांचाही या कँपेनला पाठां असून, त्यांनी सोशल मीडियावर याबाबत संवाद साधला आहे आणि लोकांना पर्यावरणीयदृष्ट्या जागरूक करण्याचा प्रयत्न केला आहे.

