पुणे विभागातील 6 लाख 73 हजार 981 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 7 लाख 65 हजार 367 रुग्ण
पुणे, दि. 1 :- पुणे विभागातील 6 लाख 73 हजार 981 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 7 लाख 65 हजार 367 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 74 हजार 85 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 17 हजार 301 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.26 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 88.06 टक्के आहे.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 5 लाख 34 हजार 411 रुग्णांपैकी 4 लाख 62 हजार 697 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 61 हजार 832 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 882 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.85 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 86.58 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 65 हजार 496 रुग्णांपैकी 60 हजार 17 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 589 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 890 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 61 हजार 750 रुग्णांपैकी 53 हजार 946 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 847 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 957 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 51 हजार 650 रुग्णांपैकी 47 हजार 806 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 44 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 800 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 52 हजार 60 रुग्णांपैकी 49 हजार 515 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 773 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 772 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 9 हजार 884 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 8 हजार 605, सातारा जिल्ह्यात 316, सोलापूर जिल्ह्यात 651, सांगली जिल्ह्यात 231 तर कोल्हापूर जिल्ह्यात 81 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 6 हजार 237 आहे. पुणे जिल्हयामध्ये 5 हजार 749, सातारा जिल्हयामध्ये 67, सोलापूर जिल्हयामध्ये 202, सांगली जिल्हयामध्ये 139 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 80 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 49 लाख 3 हजार 634 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 7 लाख 65 हजार 367 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 31 मार्च 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )