Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

एनपीसीआयतर्फे रिकरिंग पेमेंटसाठी युपीआय ऑटोपे सुविधा लाँच

Date:

  • 2000 रुपयांपर्यंतच्या रिकरिंग पेमेंट्ससाठी (विशिष्ट कालावधीत नियमितपणे करावी लागणारी पेमेंट्स) ग्राहकांना आता युपीआय प्लॅटफॉर्मवर ई- मँडेट सेट करता येईलतर 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पेमेंट्ससाठी ग्राहकांना युपीआय पिनसह प्रत्येक मँडेट अमलात आणता येईल.
  • ग्राहकांना आता कोणतेही युपीआय अप्लिकेशन वापरून रिकरिंग ई- मँडेट सेट करता येईल व मोबाइल बिल, विजेचे बिलईएमआयमनोरंजन//ओटीटी सबस्क्रिप्शनविमाम्युच्युअल फंड्सकर्जाचा हप्ताप्रवास/मेट्रो अशा विविध प्रकारच्या आणि नित्यनियमाने भराव्या लागणाऱ्या पेमेंट्ससाठी ते वापरता येईल.
  • या सुविधेमुळे लाखो युपीआय युजर्सना रिकरिंग पेमेंट्स करताना सोयीस्करपणा आणि सुरक्षा अनुभवता येईल.

नॅशलनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) रिकरिंग पेमेंट्ससाठी युपीआय ऑटोप्ले सुविधा लाँच केल्याचे जाहीर केले आहे. युपीआय 2.0 अंतर्गत लाँच करण्यात आलेल्या या नव्या सुविधेमुळे ग्राहकांना आता कोणतेही युपीआय अप्लिकेशन वापरून ई- मँडेट सेट करता येईल व मोबाइल बिलविजेचे बिलईएमआयमनोरंजन//ओटीटी सबस्क्रिप्शनविमाम्युच्युअल फंड्सकर्जाचा हप्ताप्रवास/मेट्रो अशा विविध प्रकारच्या आणि नियमितपणे भराव्या लागणाऱ्या 2000 रुपयांपर्यंतच्या पेमेंट्ससाठी वापरता येईल. रक्कम 2000 रुपयांपेक्षा जास्त असेलतर ग्राहकांना युपीआय पिनसह प्रत्येक मँडेट अमलात आणावा लागेल.

युपीआयवर आधारित कोणत्याही अप्लिकेशनमध्ये मँडेट विभाग असतोज्याद्वारे ग्राहकांना ऑटो डेबिट मँडेट तयार करता येते, मंजूर करता येतेतात्पुरते थांबवता येते किंवा त्यात हवे ते बदल करता येतात. मँडेट विभागामुळे ग्राहकांना त्यांच्या संदर्भा व नोंदीसाठी पूर्वीचे मँडेट्सही पाहाता येतात. युपीआय युजर्सना युपीआय आयडीक्यूआर स्कॅन किंवा इंटेटच्या माध्यमातून ई- मँडेट तयार करता येतात. रिकरिंग पेमेंट्सवर होणारा ग्राहकाचा खर्च लक्षात घेऊन ऑटो डेबिट मँडेट्सचा पॅटर्न तयार करण्यात आला आहे. हे मँडेट एका वेळेसाठीरोजच्यासाठीसाप्ताहिकपंधरवड्यातूनदोन महिन्यांत एकदातिमाही, सहामाही किंवा वार्षिक पातळीवर सेट करता येतात.

वैयक्तिक युजर्स आणि व्यापाऱ्यांना या सुविधेचा मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो, कारण मँडेट तत्काळ तयार करता येऊ शकतात आणि दिलेल्या तारखेस पेमेंट आपोआप वजा केले जाते. ग्राहकांना एकदा युपीआय पिनच्या माध्यमातून त्यांचे खाते प्रमाणित करावे लागते व त्यानुसार मासिक पेमेंट्स आपोआप वजा केली जातात.

युपीआय ऑटो प्लेवर आधीपासून लाइव्ह असलेल्या काही बँका व अग्रीगेटर्समध्ये अक्सिस बँक, बँक ऑफ बरोडा, एचडीएफसी बँक, एचएसबीसी बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीएफसी बँक, इंडसइंड बँक, पेटीएण पेमेंट्स बँक, ऑटोपे- दिल्ली मेट्रो, ऑटो-पे डिश टीव्ही, सीएएमएस पे, फर्लेंको, ग्रोफिटर, पॉलिसी बझार, टेस्टबुक.कॉम, द हिंदू, टाइम्स प्राइम, पेटीएम, पेयू, रेझरपे यांचा समावेश आहे. जिओ पेमेंट्स बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि येस बँकलवकरच युपीआय ऑटोपेवर लाइव्ह होतील.

इन्फोसिस लिमिटेडचे अध्यक्ष आणि सह- संस्थापक नंदन निलेकणी म्हणाले, ‘ग्राहकांच्या दैनंदिन खर्चासाठी युपीआय हे सर्व गरजा एकाच छताखाली पुरवणारे असून डिजिटल इंडियाचा कणा आहे. युपीआयवर युपीआय ऑटोप्ले उपलब्ध करणे हे डिजिटल पेमेंट्स क्षेत्रात सातत्याने नव्या सुविधा लाँच केल्या जात असल्याचे निदर्शक आहे. माझ्या अध्यक्षतेखालील आरबीआय समितीने डिजिटल पेमेंट्सची व्याप्ती वाढवण्यासाठी केलेल्या शिफारसींमध्ये या सुविधेचा प्रामुख्याने समावेश होता. युपीआय ऑटोप्लेसारखी सुविधा कार्यरत होणे हा या क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण आहे, कारण त्यामुळे मानवी हस्तक्षेपाची कमीत कमी गरज भासणाऱ्या तंत्रज्ञानाला चालना मिळाली आहे.’

एसबीआयचे अध्यक्ष रजनीश कुमार म्हणाले, आताच्या योग्य क्षणी युपीआय ऑटो प्लेसारखी सुविधा लाँच होताना पाहाणं आमच्यासाठी आनंददायी आहे. या अनोख्या सुविधेमुळे ग्राहकाना त्यांच्या रिकरिंग बिलांचे भुगतान सुरळीत करणे शक्य होईल आणि त्यांना ही बिले स्वतः भरण्याचा त्रास कमी करता येईल. ग्राहकांना सोयीस्कर सेवा सुविधा पुरवण्यासाठी बँका आणि डिजिटल पेमेंट्स क्षेत्राने एकत्र येऊन काम करताना पाहाणे हे आशावादी आहे. आम्हाला खात्री आहेकी येत्या वर्षांत सोयीस्कर व सुरक्षितपणे पेमेंट्स करण्याच्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेत नाविन्यपूर्ण डिजिटल सेवा लाँच केल्या जातील.

एनपीसीआयचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप आस्बे म्हणाले, ‘युपीआय ऑटोप्लेचे लाँच हे भारताने डिजिटायझेशनच्या प्रवासात पुढे टाकलेले आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. गेल्या काही वर्षांत आम्ही ग्राहकांच्या रिकरिंग पेमेंट्स भरण्याच्या पद्धतींमध्ये बरेच बदल पाहिले आहेत. युपीआय ऑटोप्ले सुविधा लाखो युपीआय ग्राहकांना रिकरिंग पेमेंट्स भरतान आवश्यक असलेला सोयीस्करपणा आणि सुरक्षितता देईल. ही सुविधा केवळ ग्राहकांसाठीच नव्हे, तर व्यापाऱ्यांसाठीही फायदेशीर ठरेल. युपीआयची व्याप्ती वाढवून विशेषतः पीटुएम पेमेंट क्षेत्रात विस्तार करून आम्ही नवनवीन टप्पे पार करू अशी आशा वाटते.’

आरबीआय सातत्याने ग्राहकांना डिजिटल पेमेंट्स वापरण्यासाठी प्रोत्साहन देत असताना युपीआय ऑटो प्लेसारख्या सुविधेचे लाँच जास्तीत जास्त ग्राहकांना युपीआयकडे आकर्षित करेल आणि डिजिटल पेमेंट्स क्षेत्रातील नव्या युगाचे साक्षीदार बनवेल. युपीआय 2.0 अंतर्गत ओव्हरड्राफ्ट, वन- टाइम मँडेट, इनबॉक्समध्ये इनव्हॉइस, साइन्ड कंटेंट आणि क्यूआर, फॉरिन इनवर्ड रेमिटन्स अशा व इतर विविध सुविधांचा समावेश आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कात्रज घाटात तरुणीने तरुणाला लुटले

पुणे- इंस्टाग्रामवरील ओळखीमुळे एका 28 वर्षीय तरुणाला लुटल्याची धक्कादायक...

आता विमान उड्डाणासाठी 15 मिनिटांच्या विलंबाचीही चौकशी होईल:कंपनीला कारण सांगावे लागेल; नियम तत्काळ बदलले

देशातील विमान वाहतूक क्षेत्रात प्रथमच तांत्रिक त्रुटींच्या देखरेखीची संपूर्ण...

वनराजची पत्नी सोनाली सह बंडू आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर निवडणूक रणांगणात… पोलीस बंदोबस्तात ..

पुणे-स्वतःचा नातू आयुष कोमकर खूनप्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला...