आता गाव रोखेल…कोरोना संसर्ग….!

Date:

गाव ही समुह शक्ती आहे. गावांनी मनावर घेतल्यास किती मोठं परिवर्तन होऊ शकतं हे महाराष्ट्राने ग्राम स्वच्छता सारख्या योजनातून पाहिलं आहे. गावांचा कायापालट झाल्याचे चित्र देशाने पाहिले आहे. त्यामुळे कोरोना सारखा संसर्ग सुध्दा गाव एकत्र येऊन हद्दपार करु शकतो म्हणून राज्य शासनाने कोरोनामुक्त गाव योजना सुरू केली आहे. त्याअनुषंगाने पुणे जिल्ह्यात सुरू झालेल्या या चळवळीचा हा आढावा इतर गावांना मार्गदर्शन ठरावा म्हणून देत आहोत…..

ग्रामपंचायत धामणी, ता.आंबेगाव जि.पुणे कोरोनामुक्तीकडे…
ग्रामपंचयतीची जनजागृती मोहिम धामणीगाव आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील एक प्रमुख गाव म्हणून ओळखले जाते, गावामध्ये 1960 पासून प्राथमिक आरोग्यकेंद्र आहे, गावची लोकसंख्या 2814 आहे. ग्राम दक्षता समिती सदस्य यांच्या ग्रामस्था बरोबर दर पंधरा दिवसाला बैठका व गृह भेटी घेण्यात येत. कोविड -19 आजाराबाबत विविध उपाययोजना केल्या. ग्रामसुरक्षे यंत्रणेमार्फत कोरोना उपयोजना मार्गदर्शन सूचना व लसीकरणासाठी आवाहन भ्रमणध्वनीद्वारे केले. लोकसहभाग, विविधसंस्था व कंपन्या यांच्या वर्गणीतून पाच हजार जनजागृती पत्रकांचे वाटप करण्यात आले. घंटागाडीद्वारे व लाऊडस्पीकरद्वारे जनजागृती करण्यात आली.
सर्व ग्रामस्थांना मास्कचा योग्य वापर व वारंवार हातस्वच्छ धुणे याबाबत प्रात्यक्षिक देऊन जनजागृती करणेतआली.,ग्रामपंचायत पातळीवरील शासकीय कर्मचारी व त्या त्या वॉर्डातील सदस्य यांच्या वारंवार गृहभेटीद्वारे जनजागृती करणेत आली आहे, जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आलेले 50 जनजागृतीचे फ्लेक्स व ग्राम पंचायतीमार्फत तयार करणेतआलेले फ्लेक्स गर्दीचे ठिकाणी व चौकात लावणेत आले.
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केलेल्या सुविधा
ग्रामपंचायती मार्फत 16 टीम तयार करण्यात आलेली असून त्यांना 16 पल्स ऑक्सिमीटर देण्यात आलेले आहेत. गावात 5000 व्यक्तींना मोफत मास्क् वाटप करण्यात आले. ग्रामपंचायती मार्फत स्वस्तधान्यवाटप योजने अंतर्गत लाभार्थ्यांना घरपोच सुविधा उपलब्ध करणेतआली, विविध कंपन्या, स्वयंसेवीसंस्था व देणगीदार यांचेमार्फत 400 अन्नधान्य किटवाटप करणेत आलेलेआहे., शरद भोजन योजना व शालेय पोषण आहार योजने अंतर्गत घर पोच सुविधा उपलब्ध करुनदेणेत आली. विविध कंपन्या, स्वयंसेवी संस्था व देणगीदार यांचे मार्फत 400 मेडीकल किट वाटप करण्यात आलेले. ग्रामपंचायती मार्फत सर्व 648 कुटूंबांना 2 वेळा अर्सेनिकअल्बम व व्हीटॅमिनसी गोळयांचे वाटप व साबण वाटप करण्यात आले. ग्रामपंचायती मार्फत वाडयावस्त्यां मध्ये निर्जंतूकीकरण करणेकरीता स्प्रेपंप व स्वयंसेवक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली.
धामणी हे मुख्य लसीकरण केंद्र असल्यामुळे त्या ठिकाणी तब्बल 6797 नागरिकांचे लसीकरण आत्तापर्यंत झालेले आहे. तालुका प्रशासन, प्राथमिक आरोग्य केंद्र धामणी या सर्वांच्या सहकार्याने व सर्व लोकप्रतिनीधी यांच्या मार्गदशनाने गावातील वय वर्ष 45 च्या पुढील नागरिकांचा पहिला डोस 100 टक्के लसीकरण पूर्ण केले.
कोविड-19 आजाराबाबत गावां मधील कुटूंब निहाय सर्वेक्षणे- ग्रामपंचायत कर्मचारी, तलाठी, कोतवाल, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका व शिक्षक यांना कुटूंब वाटप करुन देऊन त्यांचे मार्फत नियमित सर्वेक्षण व तपासणी केली जाते. धामणी गावात ५ टेस्टींग कॅम्प आयोजित करण्यात आले होते.त्यामध्ये गांव व परिसरातील येणारे 500 ग्रामस्थांची टेस्टींग करण्यात आली.
गावामध्ये नियमांचे पालन करत नसलेल्या नागरिकांवर कार्यवाही केली. मास्कचा वापर न केलेने वसूल केलेल्या दंडाची रक्कम-तीन हजार रुपये, दुकानदार, व्यावसायिक व व्यापारी यांना केलेल्या दंडाची रक्कम एक हजार रुपये, प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळां मध्ये स्त्री व पुरुषयांचे करीता स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करणेत आले.
संभाव्य तिसऱ्या लाटे करीता नियोजन- विलगीकरण कक्ष स्थापन करणे, लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे व त्यांचे करीता ऑनलाईन मार्गदर्शन व्याख्याने आयोजित करणे, कंपन्या, स्वयंसेवीसंस्था, सदस्य यांच्या नियोजन बैठका घेणे.
ग्रामपंचायती मार्फत रुग्णवाहिका खरेदी करणे करीता 2,00,000/- वर्गणी देण्यात आली.
ग्रामपंचायत निमगांव केतकी, ता.इंदापूर,जि.पुणे कोरोनामुक्तीकडे…
निमगांव केतकी गावाची लोकसंख्या सन 2011 ची 12,397 व सध्याची लोकसंख्या 21500 इतकी असून पुरुष संख्या- 10600 व स्त्री – 10700 अशी एकूण कुटूंब संख्या 3250 आहे.गावामध्ये मोठया प्रमाणावरती विडयाची पानांची प्रसिध्द बाजारपेठ आहे. इंदापूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ निमगांव केतकी या ठिकाणी आहे.
कोविड – 19 चा पहिला रुग्ण दिनांक 14 जुलै 2020 रोजी आढळून आला. शासकीय आदेशानूसार सर्व नियमांची अमलबजावणी करणेत आली व तो भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करणेत आला. त्यानंतर गावातील सर्व व्यापारी / दुकानदार यांची ग्रामस्तरीय समिती सोबत बैठक घेऊन शासनाच्या नियमांचे पालन करणेबाबत सुचित करणेत आलेल्या होत्या.त्यावेळी सरपंच यांनी ” माझा वार्ड माझी जबाबदारी ” अशी घोषणा करुन सर्व सदस्यांनी या घोषणेची जबाबदारी घेऊन गावामध्ये कामकाज चालू केले यामध्ये आरोग्य विभाग / शिक्षण विभाग / एकात्मिक बालविकास सेवा योजना विभाग/ महसूल विभाग / पोलीस प्रशासन / ग्रामपंचायत यांचेमूळे निमगांव केतकी गावातून कोरोना कमी करणेस यश आले असून गाव कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत आहे.

जनजागृती
ग्रामपंचायतीमार्फत 21000 पत्रके वाटप करणेत आलेले आहेत. तसेच गावामध्ये 20 प्लेक्स बोर्ड लाऊन जनजागृती करणेत आली. गावामध्ये 02 घंटागाडी याद्वारे वाडी वस्तीवर तसेच गावातील सर्व मंदिारातील लाऊडस्पीकरद्वारे जनजागृती वारंवार करणेत आली. आशा कार्यकर्ती,अंगणवाडी सेविका, शिक्षक व स्वयंसेवक यांचे मार्फत गृह भेटीद्वारे सर्व्हेक्षण व जनजागृती करणेत आली. गावातील नियुक्त शासकीय कर्मचाऱ्यांनी या जनजागृती मोहिमे मध्ये सक्रिया सहभाग घेतला होता. गावामधील स्वयंसेवकांचाही स्वयंफुर्ती ने सहभाग होता. शिक्षक/आशा कार्यकर्ती/अंगणवाडी सेविका यांच्या 48 टिम तयार करुन त्या टिम मार्फत दररोज सर्व्हेक्षण करणेत येत. तसेच गावामध्ये हॉटस्पॉटचा सर्व्हे वारंवार करणेत येत आहे.
ग्रामपंचायतीमार्फत 15000 लोकांना मास्क्‍ वाटप करण्यात आले, अन्नधान्य कीट वाटप संख्या- सुवर्ण युग पतसंस्था यांचेमार्फत 3000,भगवान भरणे प्रतिष्ठान यांचेमार्फत 2000,अष्टविनायक पतसंस्था- 2000,इतर – 1000
याप्रमाणे अन्नधान्य किट वाटप करणेत आले.
इतर सुविधा वाटप- संपुर्ण गावामध्ये आठवडयातून एकदा सोडियम हायपोप्लोराईद्वारे निर्जतूकीकरण करणेत आले. तसेच मेडिकल किटमध्ये हँड वॉश, अर्सेनिक अल्बम 30 गोळयांचे वाटप करणेत आले.
नियमांचे पालन न केलेबाबत केलेल्या दंडाची माहिती- विनामास्क फिरणा-या 510 व्यक्तींवर रक्कम रु. 51,400/- दंड वसूल करणेत आला.
व्यापारी किंवा दुकानदार / हॉटेल व्यवसायिक यांना केलेल्या दंडाची रक्कम- रक्कम रु. 33,200/- दंड वसूल करणेत आला तसेच 06 दुकाने 15 दिवसांसाठी सिल करणेत आली.
निमगाव केतकी मध्ये 50 ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यांत आलेले आहे.
आपले गाव कोरोनामुक्त करुन शासनाने सुरु केलेल्या कोरोनामुक्त गाव स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतीनी सक्रिया सहभाग घ्यावा यासाठी पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, सामान्य प्रशासन विभागाचे राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समितीचे सभापती, गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक व सदस्य यांना आवाहन केलेले आहे.
कोविड-19 व्यवस्थापनासाठी कोरोनामुक्त गावपुरस्कार योजने अंतर्गत गावाचे ग्रामसेवक, सरपंच, सदस्य, स्वयंसेवी संस्था, गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील जास्ती जास्त ग्रापंचायती या स्पर्धेमध्ये भाग घेऊन कोरोनामुक्त गांव म्हणून बक्षिस मिळवतील.

दत्तात्रय कोकरे

माहिती अधिकारी,
जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुन्हा एकदा पुण्यात भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देऊ : मुरलीधर मोहोळ

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅन्टोन्मेंट’मधील भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा ! कोरेगाव...

खंडोबाच्या जेजुरीत घडलं अघटीत..

मिरवणुकीत आगीचा भडका– २ नगरसेविका गंभीर भाजल्या, १८ जण...

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत, असे...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...