आता सिलिंडर 50 रुपयांनी; तर पेट्रोल-डिझेल 80 पैशांनी महागले:केंद्र सरकारकडून महागाईचे शॉकवर शॉक

Date:

पाच राज्यातील निवडणुका संपल्यानंतर सर्वसामान्यांना केंद्र सरकारने महागाईचा शॉक दिला आहे. देशभरात एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 50 रुपयांनी वाढ झाली आहे, तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत विधानसभा निवडणुका असल्यामुळे गेली चार महिने सिलिंडरसोबतच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती.

महाराष्ट्राला सर्वाधिक फटका
इंधनाच्या दरात वाढ झाल्यामुळे महाराष्ट्राला याचा सर्वाधिक फटका बसताना दिसत आहे. देशातील सर्व महानगरांच्या तुलनेत मुंबईत पेट्रोल व डिझेलचे दर सर्वाधिक आहेत. मुंबईत पेट्रोल 110.82 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 95.00 रुपये प्रतिलिटरवर गेले आहे. त्याच तुलनेत दिल्लीत पेट्रोल 96.21 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 87.47 रुपये प्रति लिटर आहे. म्हणजेच देशाची राजधानी दिल्लीपेक्षा मुंबईत पेट्रोलचे दर तब्बल एका लिटरमागे तब्बल 14 रुपयांनी महाग आहे. तसेच, डिझेलही तब्बल 9 रुपयांनी महाग आहे. त्यामुळे राज्यातील वाहतुकदारांनाही याची झळ बसणार असून जीवनावश्यक वस्तूदेखील महागण्याची शक्यता आहे.

याशिवाय कोलकात्यात पेट्रोल 105.51 रुपये प्रति लिटर, डिझेल 90.62 रु/लिटर आणि चेन्नईमध्ये पेट्रोल 102.16 आणि डिझेल 92.19 रुपये प्रति लिटर झाले आहे.

विनाअनुदानित सिलिंडर 949.50 रुपयांवर
14.2 किलोचा विनाअनुदानित सिलिंडर आता 949.50 रुपयांना मिळणार आहे. 5 किलोचा एलपीजी सिलिंडर 349 रुपयांना, 10 किलोचा 669 रुपयांना आणि 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 2003.50 रुपयांना मिळणार आहे.

महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर प्रति लिटर

मुंबई
पेट्रोल – 110.82
डिझेल – 95.00

पुणे
पेट्रोल – 110. 35
डीझेल – 93.14

नाशिक
पेट्रोल – 110.64
डिझेल – 93.43

औरंगाबाद
पेट्रोल – 111.64
डिझेल – 95.79

अकोला
पेट्रोल -110.58
डिझेल – 93.39

नांदेड
पेट्रोल – 113.14
डिझेल – 95.84

परभणी
पेट्रोल -113.50
डिझेल – 96.17

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...