मुंबई-“हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत यापुढे महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम् म्हणत संभाषणाला सुरुवात करतील,” अशी घोषणा राज्याचे नवे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर होऊन सांस्कृतिक खात्याची जबाबदारी येताच स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सुधीर मुनगंटीवारांनी ही घोषणा केली.देशभक्ती १ जानेवारी ते देश ३१ डिसेंबर पर्यंत संपणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आपण आजपर्यंत इंग्रजांनी दिलेला शब्द उपयोगात आणला आणि तो म्हणजे, हॅलो… हा देश जेव्हा गुलाम होता तेव्हा स्वातंत्र्यवीरांनी वंदे मातरम म्हणत तिरंगा हातात घेऊन या देशाचं स्वातंत्र्य तुमच्या माझ्या हातात मंगल कलशाच्या रूपाने दिले. पण अजूनही इंग्रजांची छाप काही कमी होता होत नाही. म्हणून आज सांस्कृतिक विभागाचा मंत्री म्हणून पहिला संकल्प मी करतोय. इथून पुढं हॅलो ऐवजी महाराष्ट्रात वंदे मातरम बोललं जाईल. चांद्यापासून बांद्यापर्यंत हा निर्णय लागू असेल. १५ ऑगस्ट म्हणजेच उद्यापासून संकल्प सुरु होईल. तुम्ही सुद्धा प्रतिज्ञा करा की आता यानंतर मोबाईलवरही वंदे मातरम म्हणू, देशभक्तांचं गीत वंदे मातरम हे अभियान सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी पर्यंत आम्ही राबवणार आहोत. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात आहे हे आपण सुरु करणार आहोत. पुढे हे देशभर जाईल. विश्वगुरु नरेंद्र मोदींनी तुमच्या माझ्या हातात तिरंगा दिला आहे. हा संकल्प आजपासून आपण सुरू करतोय. मी आपल्याला आवाहन करतो की आता कोणाचाही फोन आला, कोणाचाही मोबाईल आला, की वंदे मातरम म्हणायचं. महाराष्ट्र कहेगा वो ही देश कहेगा”
आता’हॅलो’ नाही ‘वंदे मातरम’ म्हणायचं; मंत्री मुनगंटीवारांच्या सांस्कृतिक खात्याचा पहिला निर्णय
Date: