पुणे -शहरातील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची अमंलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) शुक्रवारी मुंबई कार्यालयात तब्बल 10 तास चौकशी करण्यात आली. ईडीच्या तीन पथकांनी ही चौकशी केली. परकीय चलना विषयीच्या फेमा कायद्या अंतर्गत त्यांची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.अशी चर्चा आहे की पुण्यात कधी काळी रिक्षा चालक असलेल्या भोसले यांच्या मालकीचे हेलीकॉप्टर आहे. अनेक राजकीय नेते त्यांच्या हेलीकॉप्टरचा वापर निवडणूक प्रचारासाठी करतात.भोसले हे मोठे बांधकाम व्यावसायिक झाल्याने त्यांच्याबद्दलच्या `सक्सेस स्टोरीज`ही सोशल मिडियात व्हायरल होत असतात.अविनाश भोसले हे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरे आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्या शब्दाला वजन असल्याची चर्चा असते. थेट त्यांचीच चौकशी सुरू असल्याने खळबळ उडाली आहे
भोसले यांची एमएच 01 डीडी 0088 या क्रमांकाची कार सकाळ पासूनच मुंबईतील फोर्ट भागात उभी होती. या ठिकाणी अनेक वेळा पासून थांबलेली गाडी निदर्शनास येताच भोसले यांची चौकशी सुरू असल्याची चर्चा सुरू झाली. भोसले यांच्या चौकशीने चांगलीच खळबळ उडाली असून विविध प्रकारच्या चर्चाना उधान आले
भोसले यांची शुक्रवारी सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) चौकशी केली. 10 तासानंतर भोसले ईडीच्या बेलार्ड पियर येथील कार्यालयातून बाहेर पडले. परदेशी चलनाच्या प्रकरणात ही चौकशी झाल्याचे करण्यात आली. .भोसले यांचा बाणेर रस्त्यावर बंगला आहे. गणेशखिंड रस्त्यावर व्यावसायिक कार्यालय आहेत. राजकीय नेत्यांबरोबर घनिष्ट संबंध असलेल्या भोसले यांनी अनेक मोठे बांधकाम प्रकल्प साकारले आहेत. राजकीय नेत्यांबरोबर असलेल्या सलगीमुळे भोसले कायम चर्चेत राहिले आहेत.
मागील काही दिवसांपासून राज्यात राजकीय व्यक्तींच्या घरावर ईडीने छापसत्र सुरू केले आहे. एकंदर राज्य व केंद्र सरकार यांच्यामधील संघर्ष ईडीच्या कारवाईने समोर आल्याचे दिसून येते. मुंबईतील शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने दोन दिवसांपूर्वी छापा टाकल्याची घटना ताजी असतानाच पुण्यातील बांधकाम व्यावसायीक भोसले यांची चौकशी करण्यात आली.आज सकाळी 10 वाजता ते ईडीच्या कार्यालयात आले. 10 तास ही चौकशी चालली फेमा प्रकरणात भोसले यांचा जबाब नोंदवण्यात आला.मनी लाँडरींगप्रमाणे ईडी परदेशी चलन कराप्रकरणाच्या प्रकरणांबाबतही फेमा कायद्या अंतर्गत तपास करते. अशाच एका फेमा प्रकरणात ही चौकशी झाली. 2007 मध्ये भोसले परदेशी चलन व महागड्या वस्तू आणल्याप्रकरणी ईडी फेमा अंतर्गत तपास करत होती. पण भोसले यांना नेमक्या कोणत्या फेमाच्या प्रकरणात ईडीकडून बोलवण्यात आले होते. हे ईडीकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही
रात्री साडे आठच्या सुमारास ते ईडी कार्यालयातून बाहेर पडले. त्यावेळी त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. विदेशी चलन प्रकरणात फेमा कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात येते. सीमाशुल्क बुडवल्याप्रकरणी फेमा अंतर्गत दंडात्मक कारवाईची तरतुद आहे. ईडी परिमंडळ-2 याप्रकरणी तपास करत आहेत. यााबत ईडीचे संचालक एस.के. मिश्रा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अविनाश भोसले यांची चौकशी करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

