नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी 2022
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 15 फेब्रुवारी 2022 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेच्या माध्यमातून सीएमव्हीहीआर, 1989 च्या नियम 138 मध्ये सुधारणा केली असून त्यानुसार चार वर्षांखालील मुलांना घेऊन दुचाकीवर मागे बसवून नेणे किंवा त्यांना दुचाकीवरून नेण्यासाठी केलेल्या सुरक्षा उपाययोजनांशी संबंधित नियम निर्धारित केले आहेत. मोटार वाहन कायद्याच्या कलम 129 अंतर्गत हे नियम अधिसूचित करण्यात आले आहेत , ज्यामध्ये केंद्र सरकार नियमांनुसार, चार वर्षांखालील मुलांना दुचाकीवर मागे बसवून नेणे किंवा त्यांना दुचाकीवरून नेण्यासाठी मुलांच्या सुरक्षेसाठी काही उपाययोजना करू शकते.या नियमांमध्ये सुरक्षा सामग्री आणि मजबूत हेल्मेटचा वापर त्याचप्रमाणे अशा दुचाकीचा वेग 40 किमी प्रतितास पर्यंत मर्यादित असावा हे नमूद करण्यात आले आहे.केंद्रीय मोटार वाहन (दुसरी दुरुस्ती) नियम, 2022 प्रसिद्ध झाल्यापासून एका वर्षानंतर हे नियम लागू होतील.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने १५ फेब्रुवारी २०२२ रोजी या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. हा नियम पुढील वर्षी १५ फेब्रुवारी २०२३पासून लागू होणार आहे. सध्या या नियमामध्ये दंडात्मक रक्कम निश्चित करण्यात आलेली नाही. तसेच अधिसूचनेमध्ये दंडाची रक्कम राज्य सरकारे निश्चित करतील, असे म्हटले आहे.
नव्या प्रस्तावानुसार ४ वर्षांपर्यंतच्या मुलांना दुचाकीवर मागे बसवून नेताना बाईक, स्कूटर आणि स्कूटीसारख्या दुचाकी वाहनाची वेगमर्यादा ही ४० किमी प्रतितास पेक्षा अधिक असता कामा नये.
– दुचाकीचालकाच्या मागे बसणाऱ्या ९ महिन्यांपासून ४ वर्षांपर्यंतच्या मुलांना क्रॅश हॅल्मेट घालणे आवश्यक आहे
– दुचाकीचालक ४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना आपल्यासोबत दुचाकीवर बांधून ठेवण्यासाठी सेफ्टी हार्नेसचा वापर करेल.
– सेफ्टी हार्नेस ही मुलांना घालण्यात येणारी एक जॅकेट असते. तिची साईझ अॅडजेस्ट करता येते. ती मुलांना दुचाकी चालकाशी बांधून ठेवते. सुरक्षा जॅकेटशी संबंधित फित मुलांना दुचाकी चालकाच्या खांद्याशी जोडून ठेवण्याचे काम करतात. मंत्रालयाने या प्रस्तावाबाबत सल्ले आणि आक्षेप मागवले आहेत.
कारमध्ये मुलांच्या सुरक्षेसाठी चाइल्ड लॉकसह अनेक फिचर्स दिले जातात. या फिचर्सच्या माध्यमातून मुलांच्या सुरक्षेबाबतच्या बाबींची पूर्तता केली जाते.




