लसीकरणाचे नियोजन आणि पूर्व भागात जम्बो निट करा …
पुणे- अस्त्यावस्त लसीकरणाचा गोंधळ थांबवून त्याचे स्योग्य नियोजन करा आणि पुण्याच्या पूर्व भागाकडे म्हणजे हडपसर विभागाकडे लक्ष पूर्व इकडे जम्बो हॉस्पिटल सुरु करा अन्यथा सेनेशी गाठ आहे हे लक्षात असू द्यात असा इशारा शिवसेनेचे नगरसेवक नाना भानगिरे यांनी आज महापालिका आणि एकूणच जिल्हा प्रशासनालाही दिला आहे. तुमच्या ढिसाळ नियोजनामुळे मुख्यमंत्र्यांची मानहाणी होते आणि आम्ही ती खपवून घेणार नाही असेही नाना भानगिरे यांनी म्हटले आहे.लसींची उपलब्धता त्याबाबतची खात्री करून लसीकरण नियोजन व्यवस्थित करावे असे त्यांनी म्हटले आहे.
गेली कित्येक दिवस लसीकरण सुरु आहे मनमानेल तसे लसींचे वाटप केल्याने नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना देखील मनस्ताप झाला आहे. खरे तर आता पर्यंत ४५ च्या पुढील व्यक्तीचे लसीकरण पूर्ण व्हावे हि अपेक्षा होती . पण तुटवड्याचे कारण पुढे आल्याने नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी हे सारे सहन केले आता १ मे पासून १८ च्या पुढील सर्वानांच लसीकरण करण्यात येणार आहे. याबाबत योग्य खबरदारी घेऊन आताच आपल्याकडे लसी कशा पोहोचतील आणि याबाबत ची खात्री करवून नियोजन करावे शक्यतो तातडीच्या प्रसार माध्यमांची मदत घेऊन याबाबतची माहिती जनतेपर्यंत कार्यकर्त्यांपर्यंत स्वयंसेवी संस्थापर्यंत पोहोचवावी . पोलिसांची मदत घ्यावी .प्रत्येक भागातील नगरसेवक कार्यकर्ते मदतीस तयार आहेत . प्रशासनाने त्यांच्या मदतीने लसीकरणाचे नियोजन केले तर व्यवस्थित होऊ शकेल.असे भानगिरे यांनी म्हटले आहे.

