पुणे- नॉर्ड ड्राइव्ह सिस्टम प्रा. लि. जागतिक स्तरावरील सर्वात मोठी उत्पादक कंपनी असून पुण्यात त्याचे मुख्य केंद्र आहे. ग्लोबल सेल्स मॅनेजर ऑफ गेट्रीबेबायू नॉर्ड जीएमबीएच अॅण्ड कंपनीचे अलेक्झांडर ब्रोश, लिनोफ इंडिया प्रा. लि. चे एमडी अशोक तन्ना, नॉर्ड ड्राइव्ह सिस्टमचे एमडी पी. एल. मुथ्थूशेखर आणि ग्लोबल मॅनेजींग डायरेक्टर जुत्ता हम्बर्ट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
आधुनिक आणि अत्यंत कार्यक्षम, यंत्रसामग्रीवर आधारित ही नवीन सेवा ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. नॉर्ड उच्च दर्जाची, सर्वोत्कृष्ट मशिनद्वारे सेवा पुरवते. उत्कृष्ट परिणाम देत असताना दर्जेच्या बाबतीत तडजोड केली जात नाही. प्रशिक्षितांकडून खास देखभाल घेताना दुरूस्ती किंवा रिप्लेसमेंट योग्यरित्या केली जाते. नॉर्ड त्यांच्या उत्पादनाच्या एकूण मालकी खर्चाबाबत खात्री देते.
नॉर्ड इंडिया पाचशे चौरस मिटरचे १२ हजार पाचशे चौरस मीटरपर्यंत क्षेत्र वाढवत आहे. या सेंटरसाठी जवळपास ४५ दशलक्ष रूपयांची गुंतवणूक केली आहे. ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी भारतात ६० कोटी रूपये गुतवणूक केली आहे.
पुण्यातील सेंटरमध्ये वार्षिक २४ हजार युनिटची उत्पादन क्षमता आहे. सुमारे १० वर्षापूर्वी ही कंपनी भारतात सुरू झाली असून १ लाख युनिटपेक्षा जास्त उत्पादन झाले आहे. बाहेरील देशांमध्ये देखील नॉर्ड तर्फे सेवा पुरवली जाते.