नॉर्ड ड्राईव्ह सिस्टम्सची ‘एक्सट्रा माईल सर्व्हिस’चे अनावरण
पुणे पुण्यात मुख्यालय असलेल्या नॉर्ड ड्राईव्ह सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेडने नुकतेच आपल्या ‘एक्सट्रा माईल सर्व्हिस व्हेईकल’चे अनावरण केले. उत्पादनांचा टिकाऊपणा वाढविणे, ग्राहकांना घरपोच सेवा देण्याच्या दृष्टीने ह्या सेवेचे अनावरण करण्यात आले आहे.
नॉर्डने नव्याने लाँच केलेली ही व्हॅन सर्व प्रकारच्या आपत्कालीन व खास सेवा पुरवण्याचा दृष्टीने बनविण्यात आली आहे. नॉर्डची जागतिक पातळीवर विकली जाणारी सर्व उत्पादने भारतीय बाजारपेठेतदेखील उपलब्ध आहेत. नॉर्ड इंडियाच्या सर्व्हिस टीमने ९०% सर्व्हिस व नूतनीकरणाचे काम स्थानिक पातळीवर केले जात असल्याचा दावा केला आहे.
नॉर्ड ड्राईव्हसिस्टम्सचे एमडी पी.एल.मुथुसेकर म्हणाले की, “सिमेंट, स्टील, वस्त्र व खाद्य अशा विविध क्षेत्रांमधील आमचे ग्राहक उत्पादनांच्या गुणवत्ते बरोबर स्पर्धा करतात. आमच्या प्रतिसाद आणि सेवेच्या स्तरांवर गुणवत्ता ठरवली जाते. विश्वासार्ह यंत्रणा राखणे ही प्रत्येक ग्राहकाची गरज आहे, म्हणूनच नॉर्डच्या प्रत्येक उत्पादनासाठी त्वरित व कमीत-कमी वेळेत सर्व्हिस देऊन त्या उत्पादनांची शेल्फ लाईफ वाढविण्यासाठी आम्ही इथे तत्पर आहोत. आम्ही प्रत्येक ग्राहकाला आमच्या उत्पादनांसह एक अतिरिक्त मैल पुढे न्हेऊ इच्छित आहोत म्हणूनच आम्ही या सेवेला ‘एक्स्ट्रा माईल सर्व्हिस’ असे नाव दिले आहे”.
नॉर्डचे जनरल मॅनेजर अमित देवकुळे म्हणाले की, “आमच्या नवीन ‘एक्स्ट्रा माइल सर्व्हिस’द्वारे नॉर्ड ऊन व पावसाचा सामना करण्याची जोखीम उचलण्यास इच्छुक आहे. टोल फ्री नंबर किंवा ई-मेलद्वारे केव्हाही संपर्क केल्यास आम्ही आमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास सज्ज आहोत”.
ताज डेक्कन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आंध्र प्रदेश सरकारच्या पब्लिक एन्टरप्रायझेसचे मुख्य सचिव ए. आर. सुकुमार व तेलंगणा सरकारच्या इंडस्ट्रीज व कॉमर्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेकट्रोनिक व टेलिकम्युनिकेशनचे मुख्य सचिव जयेश रंजन उपस्थित होते. हे अनावरण नुकतेच हैदराबाद येते झाले.