औरंगाबाद नाही…. छत्रपती संभाजी महाराज नगरच…. लिहिलेले पोस्टर्स औरंगाबाद ला जाणाऱ्या प्रत्येक खाजगी, सरकारी बसेसवर ..डकविले
पुणे-औरंगाबाद नाही…. छत्रपती संभाजी महाराज नगरच…. असा मजकूर लिहिलेले पोस्टर्स औरंगाबाद ला जाणाऱ्या प्रत्येक खाजगी, सरकारी बसेसवर ..काल रात्री भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी चिटकवून आपल्या औरंगाबादच्या नामांतर लढ्याला ..’पुण्याहून स्वारी ‘ सुरु केली.

औरंगाबाद शहराचे नाव बदलुन संभाजीनगर हा विषय चांगलाच पेटलेला आहे. भारतीय जनता पक्षाने कायमच औरंगाबाद शहराला छत्रपती संभाजी महाराज नगर या नावाचा आग्रह धरला आहे.
याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चा पुणे राज्य परिवहन विभागाच्या बसेस तसेच खासगी बसेस वर औरंगाबाद नाही छत्रपती संभाजी महाराज नगरच हे पोस्टर्स लाऊन आंदोलन करण्यात आले.

औरंगजेबाची पाठराखण करताना आज महा विकास आघाडीचे सरकार थकत नाही. ही महाराष्ट्राची आज शोकांतिका- बाप्पू मानकर

या निमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष राघवेंद्र बापु मानकर यांना छेडले असता ,ते म्हणाले ‘ ‘स्वराज्य ही काही फक्त एक संकल्पना नव्हती. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या आणि हिंदूंच्या अस्मितेच्या विझलेल्या निखार्यावर मारलेली वादळा सारखी फुंकर होती.छत्रपती शिवाजी महाराज पासून पेटलेली ही आग छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतः च्या प्राणाची आहुती देऊन या आगीचा वणवा केला. परंतु छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करणारा या औरंगजेबाची पाठराखण करताना आज महा विकास आघाडीचे सरकार थकत नाही. ही महाराष्ट्राची आज शोकांतिका आहे. परंतु छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव दिल्या शिवाय भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता युवा मोर्चा गप्प बसणार नाही. ‘


