Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कितीही छापे मारले,दबाव आणला तरी महाराष्ट्रातील सरकार डगमगणार नाही -शरद पवारांचा केंद्राला खणखणीत इशारा

Date:

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमती खाली आल्या तरी पेट्रोल डिझेलच्या किमती का वाढविल्या ?

पुणे- कितीही सरकारी यंत्रणांचा बळजबरी गैरवापर करून कुठे कितीही छापे मारले ,दबाव आणला तरीही महाराष्ट्रातील सरकार अजिबात डगमगणार नाही असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केंद्रातील भाजपा सरकारला दिला एवढा सत्तेचा उन्माद ठीक नाही असेही त्यांनी म्हटले अजित पवार , नवाब मलिक यांच्या नातेवाईकांना याच हेतूने छळले जात असल्याचा घणाघात हि आज पवार यांनी केला

आज पिंपरी चिंचवड मध्ये पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले,’

जिथं भाजपची सत्ता नाही तिथल्या सरकारला केंद्र सरकार केंद्रीय संस्था हातात धरून त्रास देत आहे.केंद्र सरकारला सामान्य माणसांविषयी आस्था नाही. पेट्रोल- डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत म्हणत राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहेकेंद्र सरकारकडून 35 हजार कोटी जीएसटी रक्कम येणे बाकी आहे. तर 3 हजार कोटींची बाकी असल्याने कोळशाचा पुरवठा मात्र थांबवल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला. सध्या सीबीआय, आयकर, एनसीबी आणि ईडीसारख्या केंद्रीय संस्थांचा वापर करून भाजपविरहीत राज्य सरकारांना भाजप त्रास देत असल्याचे पवार म्हणाले.अजित पवारांच्या तीन भगिनींच्या घरी जाऊन आयकर विभागाने छापे टाकले. हा विषय कोर्टात असल्यामुळे मी अधिक काही बोलणार नाही. पण त्यात काहीही निष्पन्न होणार नाही. पण 14 ते 15 लोकं 5 दिवस छापे मारतात, त्यांचं काम संपल्यानंतरही त्यांना थांबायला सांगितलं जात होतं. एखाद्याच्या घरी इतके लोक पाठवून पाच-पाच दिवस ठेवून दबाव आणला जात आहे. चौकशी झाल्यावर पाहुण्याने जाणे आवश्यक होते. परंतु हा पाहूणा पाच-पाच दिवस मुक्काम करत होता. पाहूणा जेव्हा जात नाही तेच त्याची हकालपट्टी केली जाते. पाहुण्यांची काही चुकी नव्हती. त्यांना वरून तसे आदेश देण्यात आले होते.

पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे-

– आरोप करणारे परमबीर सिंह आता कुठे गायब झाले?

– भाजपची सरकारे नसलेली राज्ये केंद्राकडून अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहेत.

– केंद्र राज्यावर, लोकप्रतिनिधींवर दडपण आणण्याचा प्रयत्न करत आहे.

– एनसीबीकडून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय.

– मत्र्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न.

– मलिकांनी केंद्राविरोधात मते मांडल्याने सुडबुद्धीने त्यांच्या जावयावर कारवाई.

– खासदार भावना गावित, अनिल परब, नवाब मलिक यांच्या विराधात यंत्रणांचा गैरवापर केला.

– केंद्राकडून सत्तेचा गैरवापर वाढत आहे.

– केंद्रीय संस्थांना हाती धरून केंद्र सरकार दहशत पसरवत आहे.

– महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याचे काम केंद्र सरकार करतेय.

– गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना पंच म्हणून घेऊन चांगल्या माणसांच्या विरोधात खोटे पुरावे तयार करून अडकविण्याचे काम सुरू आहे.

– शासकीय यंत्रणेची तक्रार असेल त्यांनी खुलासा करणे योग्य आहे. मात्र, भाजपचे खासदार, माजी मुख्यमंत्री खुलासा करतात. याचा अर्थ काय?

– ”मी येणारच…असे छाती ठोक पणे सांगणारे , ते काही आले नाही म्हणून राजकीय आकसाने चौकशी सुरू आहे.

– एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडला म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत येत आहे.

– एक माजी खासदार, एक माजी मुख्यमंत्री बोलले की यंत्रणा लगेच कारवाई सुरू केले आहे, यावरून काय समजायचे?

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमती खाली आल्या तरी पेट्रोल डिझेलच्या किमती का वाढविल्या ?

 “सामान्य लोकांचे प्रश्न वाढत आहेत आणि केंद्रातील सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे. त्यांना त्या प्रश्नांसंबंधी आस्था नाही. आपण बघतो आहोत, साधारण दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती काहीना काही वाढताना दिसत आहेत, असं कधी घडलं नव्हतं.”

तसेच, “केंद्र सरकारच्यवतीने सांगण्यात येतं, की आंतराराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमतीचा हा परिणाम आहे. पण मला आठवतयं, साधारण सहा महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमती एकदम खाली आल्या, पण केंद्र सरकारने या देशातील पेट्रोलच्या किंमती कमी केल्या नाहीत. किंवा जगभरातील पेट्रोल निर्माण करणाऱ्या देशांच्या किंमतींमध्ये घसरण होत असताना, इथे मात्र किंमती वाढत राहिल्या.” असंही शरद पवार यांनी बोलून दाखवलं.

याचबरोबर, “मनमोहन सिंग यांचं जेव्हा सरकार होतं,त्या सरकारमध्ये मी होतो आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोलच्या किंमती वाढल्या, म्हणून आम्हाला किंमती वाढवायचा निर्णय घ्यावा लागला. हा निर्णय घेतल्यानंतर दहा दिवस सलग संसदेचं कामकाज चालू न देण्याची भूमिका, ही भाजपाने विरोधी पक्ष म्हणून तेव्हा घेतली होती. आणि आज स्वतःचा पक्ष सत्तेवर असताना दररोज पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढवल्या जात आहेत. सामान्य माणसाला महागाईच्या संकटात अधिक ढकलण्याच काम केलं जातयं. ” असा आरोप भाजपा सरकारवर यावेळी पवारांनी केला.“ महाराष्ट्राचा विद्यूत पुरवठा हा तीन प्रकारचा आहे. एक कोळशापासून वीज निर्मिती, दुसरं धरणामधील पाण्यापासून वीज निर्मिती आणि तिसरा औष्णिक वीज जी महाराष्ट्रात तारापूर किंवा काही ठिकाणी तयार होते. आज वीजेचे दर हे कमी करण्यसाठी काही काळजी घेतली पाहिजे ही भूमिका राज्य सरकारने घेतली. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काम, कोळशाच्या किंमती कमी करण्याच्या संबंधीचा आग्रह आपण धरला आहे. परंतु, आजच मी केंद्र सरकारचे त्या संबंधित खात्याचे मंत्री यांच्याशी चर्चा केली व त्यांनी सांगितलं, की महाराष्ट्र सरकारकडून तीन हजार कोटी रुपयांची कोळसा पुरवठ्याच्या रक्कमेची थकबाकी आलेली नाही. त्यामुळे केंद्र सरकारला अडचणींना तोंड द्याव लागत आहे. मी माहिती घेतली, तीन हजार कोटींचं देणं आहे हे खरं आहे. त्यातील १४०० कोटी द्यायची व्यवस्था काल मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांनी केलेली आहे. ही रक्कम आज उद्या जाईल,. पण मी तुम्हाला दुसरा प्रश्न सांगत होतो की महाराष्ट्राकडून कोळशाची किंमत द्यायला, दहा ते बारा दिवस उशीर झाला, म्हणून केंद्राचे मंत्री महाराष्ट्र सरकारवर आरोप करतात. दुसऱ्या बाजूने जीएसटी ज्याची रक्कम महाराष्ट्रातून केंद्र सरकारने वसूल केलेली आहे, ती ३५ हजार कोटींची आहे. ते ३५ हजार कोटींचं येणं महाराष्ट्राचं केंद्राकडून आहे आणि ते मागील काही महिन्यांपासून अद्याप देत नाहीत. एकाबाजुने ३५ हजार कोटी ही महाराष्ट्राची रक्कम आपण थकवायची आणि कोळशाच्या रक्कमेबद्दल आठ ते दहा दिवसांत देतो असं सांगूनही महाराष्ट्र सरकारवर दोषारोप करायचा, ही गोष्ट काही योग्य नाही. आणि हे दुर्दैवाने आज या ठिकाणी घडतयं. ” असं देखील शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.

‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत हा माझाच आग्रह..

सुरवातीला उद्धव ठाकरे नेतृत्व करण्यास तयार नव्हते. मुख्यमंत्री पदास त्यांनी नकार दिला होता. पण आपल्या जुन्या मित्राच्या चिरंजीवाला संधी द्यावी म्हणून मी उद्धव ठाकरेंचा हात वर केला, असं शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. त्यावेळी राज्यात आघाडी सरकार बनवण्यात माझाही सहभाग होता, ही माहिती पवार यांनी दिली. राज्यात सरकार तयार होताना मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल हे सर्वांनी एकमताने मान्य केल्याचे शरद पवारांनी यावेळी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हडफडे नाईटक्लब आग प्रकरण: अधिकारी निलंबित, चौकशीला गती; मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश

गोवा पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना, सर्व पर्यटन आस्थापनांचे सुरक्षा...

कंत्राटदारांच्या प्रश्नावर संसदेच्या अधिवेशनानंतर पुण्यात बैठक

शरद पवार यांचे सुनील माने यांना आश्वासननवी दिल्ली :...

पुण्यातील उत्तर प्रदेशीय भामट्या रिक्षाचालकाला दिल्लीत जाऊन पकडला..

बाणेरमध्ये एकाला रिक्षाने उडवलं, उपचाराच्या बहाण्याने नेलं ,पण ...