‘निवडुंग’चा संगीत प्रकाशन सोहळा संपन्न

Date:

गीत-संगीत हा भारतीय सिनेमांचा आत्मा असल्याचं मानलं जातं. त्यामुळेच केवळ हिंदी चित्रपटच नव्हे, तरप्रादेशिक चित्रपटही गीत-संगीताने सजवले जातात. मराठी चित्रपटांनी यात आपलं वेगळेपण जपत नावीन्याच्या जोडीला पारंपारिक लोककलेची जोड देत रसिकांचं मनोरंजन केलं आहे. अलीकडच्या काळातील निर्माते-दिग्दर्शकही हाच वसा जपत रसिकांची सेवा करीत आहेत. यांच्याच पावलावर पाऊल टाकत निर्माते-दिग्दर्शक मुनावर भगत यांनी ‘निवडुंग’या संगीतप्रधान चित्रपटाची निर्मिती केली आहे.

‘मीना शमीम फिल्म्स’च्या बेनरखाली तयार झालेल्या ‘निवडुंग’ या आगामी मराठी चित्रपटाची निर्मिती मुनावर भगत यांनी केली आहे. या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा नुकताच जुहू येथील सी साईड या हॉटेलमध्ये मोठया दिमाखात पार पडला. याप्रसंगी निर्माते-दिग्दर्शक मुनावर भगत, संगीतकार रफिक शेख, चित्रपटातील कलाकार भूषण प्रधान,संस्कृती बालगुडे, शेखर फडके, सहदिग्दर्शक शशिकांत मिना, केमेरामन एकेन. सेबास्टेन, झी म्युझिकचे मोहित पोतदार,वितरक गिरीश वानखेडे यांच्यासह मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील काही मान्यवर मंडळी उपस्थित होती.

‘निवडुंग’ या चित्रपटात एकूण सहा गाणी आहेत. या सहाही गीतरचना चित्रपटाच्या कथेशी एकरूप होणाऱ्या असून महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या  आहेत. वेगवेगळया मूडमधील या सहाही गीतरचनांना संगीतकार रफीक शेख यांनी स्वरसाज चढवला आहे. या चित्रपटातील “विठ्ठला, विठ्ठला…’’ हे भक्तीपूर्ण गीत झहीर कलाम यांनी लिहिलं असून स्वप्नील बांदोडकरने गायलं आहे. “माझ्या ज्वानीला अंगभर भिजवा…’’ ही या चित्रपटातील झहीर कलाम यांची लावणी उर्मिला धनगरच्या भारदस्त आवाजात ध्वनीमुद्रित करण्यात आली आह. प्रसाद कुलकर्णी  यांनी लिहिलेलं ‘‘माझे मला कळेना…’’हे सेड साँग डॉ. नेहा राजपाल आणि रफीक शेख यांनी गायलं आहे. कवी शरद यांच्या लेखणीतून अवतरलेली
‘‘तिला मी पाहिले…’’ ही गजलही डॉ. नेहा राजपाल आणि रफीक यांनी गायली आहे. याशिवाय रफिक यांनी सुरेश वाडकर यांच्या सोबत गीतकार कलाम यांच्या लेखणीतून साकारलेले "कुबेराच्या घरात…"  हे गीतही गायलं आहे. ‘‘धोंडी धोंडी पानीदे…’’ या कलाम यांनी लिहिलेल्या गीतालाही रफीक शेख यांनीच स्वर दिला आहे.
महाराष्ट्रात सध्या भेडसावत असलेली सर्वात भीषण समस्या म्हणजे दुष्काळ.  आपल्याकडे  शेतकऱ्यांना
आत्महत्या केल्यावर पैसे मिळतात, पण जिवंतपणी पैशाअभावी जीव देण्याची पाळी येते. नेमक्या याच प्रश्नावर भाष्यकरणारा ‘निवडुंग’ हा सिनेमा आहे. सामाजिक आशय असलेल्या या चित्रपटात एका वेगळया प्रकारची प्रेमकथाही पाहायला मिळेल. मराठीत पदार्पण करताना मुनावर भगत यांनी दुष्काळासारखा महत्त्वाचा विषय हाताळला आहे. या विषयाला गीत संगीताची उचीत जोड देत तो मनोरंजनदृष्ट्या परिपूर्ण बनवला आहे. मराठीतील आघाडीच्या गायकांनी या चित्रपटासाठी
गायन केले आहे. संगीताची जाण असणाऱ्या  संगीतकार रफीक शेख यांच्या संगीताने हा चित्रपट सजवला आहे,
भूषण प्रधान आणि संस्कृती बालगुडे या चित्रपटात प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार असून सारा श्रवण, अस्ताद काळे, प्राजक्ता दिघे, शेखर फडके यांच्याही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा मुनावर भगत यांनी लिहिली असून महेंद्र पाटील यांनी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. शशिकांत मिना या सिनेमाचे सहदिग्दर्शक असून एकेन. सेबास्टेन या सिनेमाचे केमेरामन आहेत. मेघा सपंत यांनी या चित्रपटातील तीन गाण्यांसाठी नृत्य दिग्दर्शन केले आहे. या सिनेमातील गीतांना संगीतकार रफिक  शेख यांनी संगीत दिले असून कार्यकारी  निर्माते संदिप मोरे आहेत .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

घरगुती एलपीजी  सिलेंडर्सचा पुरवठा सुरळीत; टंचाईच्या भीतीने केल्या जाणाऱ्या  नोंदणीत घट- सरकारचा दावा

सरकारकडून राज्यांना व्यावसायिक एलपीजी वाटपात वाढ; प्रमुख क्षेत्रांना प्राधान्य आणि...

भोंदूबाबाला मदत करणाऱ्या सर्वांचीच नावे जाहीर करून कारवाई करा -रवींद्र माळवदकर

पुणे- भोंदू बाबा खरातला डायरेक्ट इनडायरेक्ट मदत करणाऱ्या सर्वपक्षीय...

राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण:बारा हजाराहून अधिक विद्यार्थिनी व शिक्षकांनी घेतला लाभ

मुलींच्या स्वसंरक्षणाच्यादृष्टीने महत्त्वाचा उपक्रम- शालेय शिक्षण मंत्री दादाजी...

रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष मान्यता मिळवून देणार:रामदास आठवले यांचा निर्धार

पुणे ;  रिपब्लिकन पक्षाला सर्वसमावेशक स्वरूप प्राप्त करून देऊन राष्ट्रीय...