पुणे-
महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी पुणे शहर व जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने जो भरघोस निधी दिला त्याबद्दल पुणेकरांच्या वतीने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पर्वती विधानसभा मतदार संघात सिटीप्राईड चौक, सातारा रोड येथे पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पर्वती मतदार संघाचे अध्यक्ष नितीन कदम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
पुणे शहराला राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये मेट्रो आणि रिंग रोड साठी भरीव तरतूद करून पुणे शहराची वाहतूक समस्या मार्गी लावण्याचे काम अजितदादा_पवार यांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केलेला आहे. पर्वती मतदारसंघांमध्ये आनंदाची बाब म्हणजे सातत्याने होत असलेले मेट्रो कात्रज पर्यंत विस्तारण्याची हीसुद्धा मागणी अजितदादा यांनी अर्थसंकल्पामध्ये भरघोस तरतूद करून उचलुन धरली त्याबद्दल अजितदादा यांचे अभिनंदन करुन नागरिकांना पेढे वाटुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
पुणे याप्रसंगी रवींद्र माळवदकर, दिलीप अरुंदेकर, मृणालिनी वाणी,संतोष नांगरे,सचिन पासलकर,आनंद बाफना,गौरी जाधव,संजय दामोदरे, संदीप काळे,श्वेता होनराव, अमोल नानावरे, अमित अग्रवाल, दत्ता कांबळे, अर्जुन भिसे, अण्णा टिळेकर, रजियाभाभी शेख, तुषार नांदे,संतोष पिसाळ,प्रदीप शिवशरण,हरिष खर्डेकर,श्रिकांत मेमाने, प्रमोद प्रमोद,प्रमोद बाफना, सचिन जमदाडे,अर्जुन भिसे, अर्जुन लोखंडे,प्रशांत कुदळे,सचिन समेळ, संतोष आढागळे, मोसिन काजी,निलेश नवलखा,दिपक ठाकर,योगेश डोळस उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन पर्वती अध्यक्ष नितिनकदम व कार्याध्यक्ष दिलीपअरुंदेकर यांनी केले होते.

