नवी दिल्ली-
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज मध्य प्रदेशमध्ये 5722 कोटी रुपये खर्चाच्या एकूण 534 किमी लांबीच्या 11 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी केली.
यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, या प्रकल्पांमुळे यात्रेकरू आणि पर्यटकांना सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे. ते म्हणाले की, यामुळे उज्जैनला लागून असलेल्या कृषी बाजारपेठेतून उत्तम कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल. ते म्हणाले की, उज्जैन-देवास औद्योगिक मार्गिका विकसित केली जाईल ज्यामुळे रोजगार निर्मितीच्या नवीन संधी निर्माण होतील. त्याचबरोबर संपूर्ण माळवा-निमार प्रदेशाचा विकास केला जाईल , सीमावर्ती भाग साठवणूक केंद्रे म्हणून विकसित केला जाईल , यामुळे वेळ आणि इंधनाची बचत होईल आणि प्रवासही सुरक्षित होईल असे गडकरी म्हणाले.

सरकार सर्वांसाठी सुरळीत संपर्क व्यवस्था, वेगवान विकास, उत्तम सुरक्षा आणि समृद्धी सुनिश्चित करण्याच्या वचनबद्धतेसह अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निरंतर पावले उचलत आहे.

