सिंधुदुर्ग कोर्टातला आजचा युक्तिवाद संपला
सिंधुदुर्ग-भाजप आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर उद्या पुन्हा सिंधुदुर्ग सत्र न्यायालय सुनावणी होणार आहे. आजचा युक्तिवाद संपला असून उद्या या जामीन अर्जावर निर्णय दिला जाणार आहे. संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणे यांना अटक होणार की नाही यावर सध्या प्रश्नचिन्ह आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सिंधुदुर्गातील कणकवली पोलिसांकडून नोटीस बजावली. पोलिस स्टेशनला हजर राहण्यास या नोटीसमध्ये सांगण्यात आले. आमदार नितेश राणे हे नॉट रिचेबल असताना पोलिसांनी नारायण राणे यांना कणकवली पोलिसांकडून नोटीस आली.दरम्यान, पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी नितेश राणे कुठे आहे हे मला माहिती असुन देखील मी सांगणार नाही असे वक्तव्य केले होते. त्यावरुनच पोलिसांनी नारायण राणेंना नोटीस बजावली आहे. नारायण राणेंना हजेरीसाठी दुपारी 3 वाजता वेळ देण्यात आली होती. परंतु, नारायण राणे हजर झाले नाहीत. त्यानंतर पोलिसांनी तीच नोटीस राणेंच्या घरावर चिकटवली. याच्या काही मिनिटांतच राणेंच्या घरातील कर्मचाऱ्यांनी ती काढून टाकली.