सिंधुदुर्ग-नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे राणेंना आजची आणि उद्याची रात्र कणकवली पोलीसांच्या कोठडीतच काढावी लागणार आहे.
दरम्यान, नितेश राणे यांनी आज सकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली दिवाणी न्यायालयात शरण अर्ज दाखल केला. त्यानंतर नितेश राणे यांच्या वकिलांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. तर सरकारी वकिलांकडून नितेश राणेंच्या पोलीस कोठडीची मागणी केली. या मागणीसाठी पोलिसांना सबळ कारणे दिले. त्यामुळे नितेश राणेंना पोलिस कोठडी सुनावली आहे.
कणकवली दिवाणी न्यायालयात सुनावणी सुरु असल्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दंगल नियंत्रण पथक न्यायालयाबाहेर तैनात होते.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी नितेश राणे आरोपी आहेत.

