निर्भयाच्या चारही मारेकऱ्यांना अखेर तिहार तुरुंगात पहाटे 5.30 वाजता सुळावर लटकवले

Date:

नवी दिल्ली – दिल्लीतील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींना आज सूर्योदयापूर्वीच फासावर लटकवण्यात आले. निर्भया आणि तिच्या कुटुंबियांना अखेर 2650 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर न्याय मिळाला. चारही दोषी विनय कुमार शर्मा, पवन कुमार गुप्ता, मुकेश सिंह आणि अक्षय कुमार सिंह यांना पहाटे 5.30 वाजता फाशी देण्यात आली आहे. निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवल्याच्या वृत्तावर तिहार तुरुंगाचे महासंचालक संदीप गोयल यांनी शिक्कामोर्तब केले. तिहार जेलमधील क्रमांक तीनच्या तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली आहे. फाशीनंतर डॉक्टरांनी चारही दोषींची रितसर मेडिकल टेस्ट घेतल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. तिहार तुरुंगाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

……7 वर्षे 3 महिने आणि 4 दिवसानानंतर ती पहाट आली, जेव्हा निर्भया खरंच हसली. शुक्रवारी सकाळी साडे पाच वाजता तिच्या सर्व दोषींना फाशी देण्यात आली. दोषींना एकत्र तिहार जेलमध्ये फासावर लटकावले गेले.

16 डिसेंबर 2012 च्या रात्री दिल्लीमध्ये सहा नराधमांनी निर्भयासोबत दुष्कृत्य केले होते. एकाने तुरुंगात आत्महत्या केली, दुसरा अल्पवयीन असल्यामुळे तीन वर्षानंतर सुटला. उरलेले चौघे – मुकेश, अक्षय, विनय आणि पवन आपल्या मृत्यूच्या 2 दोन तास अधीपर्यंत रडत क्षमेची याचना करत होते. शेवटी विजय निर्भयाचाच झाला.

अपडेट्स:

  • 5:30 AM : जल्लादने चारही आरोपींना फासावर लटकावले.
  • 5:37 AM : तुरुंग प्रशासनाने 7 मिनिटानंतर आरोपींच्या मृत्यूची पुष्टि.
  • 6.10 AM : मेडिकल ऑफिसर्सनी चारही आरोपींना मृत घोषित केले.
  • 6:25 AM : आरोपींकचे मृतदेह फासावरून खाली उत्तरावले गेले.
  • 6: 40 AM : तिहारच्या बाहेर ‘निर्भया अमर रहे’ आणि ‘भारत माता की जय’ या घोषणा दिल्या गेल्या. आनंद साजरा केला गेला.
  • 7:10 AM : दोन ऍम्ब्युलन्स तिहार जेलमध्ये पोहोचल्या. जेल परिसराच्या बाहेर सुरक्षा हटवली गेली.

चारही दोषींना फाशी झाल्यानंतर निर्भयाच्या आईने आपल्या मुलीच्या फोटोला घट्ट मिठी मारली आणि निर्भयाला अखेर न्याय मिळाला असे उच्चारले. निर्भयाला न्या मिळवून देण्यासाठी मी न्यायव्यवस्था आणि भारत सरकारचे आभार मानते. आजचा दिवस देशातील महिला आणि मुलींच्या नावे समर्पित आहे. आम्ही फाशीचा आनंद साजरा करणार नाही. पण मी हे जरुर सांगेन की या फाशीनंतर आता गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण होईल. आजचे सूर्य माझ्या मुलीच्या नावे. देशातील तमाम महिला आणि मुलींचे देखील आभार अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने दिली.

अशी झाली फाशी…

7 वर्षे, 3 महीने आणि 4 दिवसानंतर निर्भयाला अखेर न्याय मिळाला. तीच निर्भया जिच्यावर 16 डिसेंबर 2012 च्या रात्री दिल्लीत चार नराधम मुकेश, अक्षय, विनय आणि पवनने बलात्कार केला होता. या दोषींच्या विरोधात कनिष्ठ न्यायालयाने 9 महिन्यांच्या आतच फाशीची शिक्षा सुनावली होती. 6 महिन्यानंतर दिल्ली हायकोर्टाने ही शिक्षा कायम ठेवली. त्यानंतर मे 2017 सुप्रीम कोर्टने देखील फाशीवर शिक्कामोर्तब केला होता. तरीही फाशी होता-होता 2 वर्षे 10 निघून गेले. कोर्टाने शुक्रवारी फाशीची तारीख निश्चित केली होती. तत्पूर्वी दोषींनी 15 तासांत 6 याचिका देखील केल्या. त्या सर्व फेटाळून लावण्यात आल्या. यानंतर पहाटे 5 वाजता फाशी तयारी सुरू झाली. दोषींना फाशीच्या फळीपर्यंत नेण्यात आले. चौघांचे हात-पाय बांधण्यात आले. यावेळी विनय रडत होता. तरीही दोषींच्या गळ्यात फाशीचे दोरखंड टाकण्यात आले. चेहरा झाकण्यात आला आणि जल्लादाने लीवर ओढले. फाशी होताच जणू देशाला न्याय मिळाला अशी भावना सर्वच देशवासियांमध्ये होती. तुरुंग प्रशासनाने 7 मिनिटानंतर चौघांच्या मृत्यूची माहिती जारी केली. त्याच्या 30 मिनिटानंतर डॉक्टरांनी सुद्धा तपास करून दोषींना मृत घोषित केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सर्व धर्मीय ख्रिसमस स्नेह मेळावा संपन्न

पुणे; पुण्यातील येरवडा – शास्त्रीनगर भागातील सेक्रेड हार्ट चर्च येथे...

पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी जास्तीत जास्त दर देण्याचा विचार•...

राज बब्बर,रमेश बागवे, मोहन जोशी,वसंत पुरकेंसह काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर.

मुंबई, दि. २३ डिसेंबर २०२५ राज्यातील २९ महानगरापालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस...

सत्तेच्या लोभी राजकारणाला आम आदमी पार्टी शह देईल..अरविंद केजरीवाल,भगवंत मान पुण्यात प्रचाराला येणार

पुणे- ' महाराष्ट्रात प्रस्थापित राजकीय पक्षांनी विचारधारा सोडून सामान्य...