जेजुरी ( प्रतिनिधी ) – लग्नातल्या उखाण्यांची ठसक….मनोरंजनासाठी गाणी…गप्पा…...चिमुरड्यांचे नृत्य ओसंडून वाहणारा तरुणी आणि महिलांचा उत्साह…, ग्रुप बनविण्याच्या स्पर्धेतील महिलांची चढाओढ, याबरोबरच फुगे फोडणे त्यामधून अनेक महिलांनी चढलेली गुणांची शिडी आणि अखेरच्या संगीत खुर्चीच्या सामन्यात एकमेकींना दिलेली जोरदार टक्कर..,अशा विविध खेळांचा आनंद घेत कोथळे येथील आझाद चौक येथे पैठणीचा खेळ रंगला. प्रसिद्ध शिवव्याख्याते निलेश जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी एकापेक्षा एक रंगलेल्या या बहारदार स्पर्धेत सहभागी होऊन यशाचे शिखर गाठत महिलांनी पैठणीचा मान मिळविला. या वेळी जेजुरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे, मार्तंड देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त राजकुमार लोढा , संदीप जगताप , शिवराज झगडे ,पंकज निकुडे , जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हाके साहेब , भारतीय जनता पक्षाचे आर.एन.जगताप ,नगरसेवक योगेश जगताप , नगरसेवक गणेश जगताप ,हेमंत सोनवणे, दिवेकर साहेब ,प्रा.केशव काकडे, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय भोईटे, दिलीप जगताप , वाल्मिक जगताप, राहुल भोसले, प्रकाश महाराज जगताप , दत्ताआबा भोईटे , विश्वास जगताप आणि विविध मान्यवर उपस्थित होते. शिवव्याख्याते निलेश जगताप यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले . अखेरपर्यंत रंगलेल्या ‘खेळपैठणीच्या’ या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. कोथळे पंचक्रोशीमधील शेकडो महिला या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.कार्यक्रमाची सुरुवात खुमासदार उखाणे घेत झाली. एकापेक्षा एक बहारदार उखाण्यांचा जणू रंगमंचावर पाऊसच पडला. याप्रसंगी हा खेळ खेळतानादेखील महिलांचा उत्स्फूर्त उत्साह पाहायला मिळाला. स्वाती कडूच्या निवेदनाणे, रितेश साळवेच्या कवितांनी आणि अनिकेत हुंबरेच्या गाण्यांनी कार्यक्रमात रंगत आणली.
याबरोबरच फुगे फोडणे ,स्ट्रोच्या माध्यमातून बोल घेऊन जाने हे मनोरंजनात्मक खेळदेखील या वेळी घेण्यात आले. त्यानंतर आयोजित अखेरचा संगीत खुर्चीचा सामना जोरदार रंगला. संगीत खुर्चीचा सामना पाहताना सर्वांच्या मनात धस्स झाले होते. मात्र, झालेल्या सर्व स्पर्धांमध्ये मिळविलेल्या यशाप्रमाणे संगीत खुर्चीमध्येही यश मिळवत वंदना जगताप, राणी गुरव , ज्योती जगताप , सुरेखा जगताप ,शारदा जगताप यांनी मानाची पैठणी पटकावली. उल्का भोईटे ,संगीता जगताप, सविता शिळमकर ,राजश्री जगताप यांच्या हस्ते विजेत्या महिलांना पैठणी देण्यात आली . पैठणीच्या खेळात सहभागी झालेल्या सर्व महिलांना आणी तरुणींना आकर्षक भेटवस्तू देण्यात आली तसेच चिमूकल्याना सुद्धा यावेळी भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमाचे आयोजन संदीप जगताप, आकाश शिळमकर , प्रतिक वखरे, तुषार काकडे , आकाश लेंडे, , ऋषिकेश काकडे ,विजय जगताप , शुभम साबळे आदींनी केले , सूत्रसंचालन दत्तात्रय भोईटे यांनी तर आभार संदीप जगताप यांनी मानले.