Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

स्वत:चे आयुष्य घडवा,बिघडवू नका -निलेश जगताप

Date:

वडवणी-आजच्या अधुनिक युगात तरूणाई वाम मार्गाला लागुन आपले आयुष्य बरबाद करू लागली आहे.अरे जरा थांबवारे हा उपद्रव स्वत:चे आयुष्य स्वत:नेच घडवयाचे असते अशी शिकवण त्याकाळी राजमाता,राष्ट्रमाता जिजाऊ माँ.साहेब यांनी दिली.ते आचरणात आणा आणि स्वत:चे आयुष्य घडवा असे आवाहन आपल्या सुमधुर व्याख्यानातुन प्रसिध्द व्याख्याते  शिवचरित्रकार निलेश जगताप यांनी जिजाऊ जन्मउत्सवा निमित्त आयोजित व्याख्यानमालेत व्यक्त केले.यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्याचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांची विशेष उपस्थिती होती.तत्पुर्वी उपस्थित मान्यवरांचे हस्ते माँ जिजाऊ साहेबांच्या व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले.
  वडवणी तालुका शिवसेनेच्या व समाज बाधवांच्या वतीने मोठया उत्सवात माॅ साहेब जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली.
बीड- परळी हायवे रोडवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकात भगवा ध्यज फडकावुन अभिवादन करण्यात आले. यानंतर शहरातील जाधव कॉम्प्लेक्स मध्ये व्याख्याते निलेशजी जगताप यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. यावेळी पञकार हल्ला कृती समीतीचे राज्य अध्यक्ष एस.एम.देशमुख यांची विषेश उपस्थिती लाभली.
पुढे बोलतांना व्याख्याते जगताप म्हणाले की,
राजमाता, स्वराज्यमाता, राष्ट्रमाता,लोकमाता जिजाऊ मा साहेबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. जिजाऊ मा साहेबांचे नाव घेताच त्यांचे कार्य आठवते; आणि त्यांच्या चरणी मन हजारदा लोटांगण घेत राहते. इतिहास आम्हाला त्यांच्या नितीसाम्पन,महत्वाकांक्षी, परिवर्तनवादी,कर्तव्यदक्ष,त्यागी ,न्यायनिष्ठुर ,
 समतावादी ,दूरदृष्टी ,करारी ,धाडसी ,पराक्रमी इत्यादी दुर्मिळ गुणांची साक्ष देत आहे; त्यांच्या श्रेष्ठ कर्तुत्वाची ग्वाही देत आहे. या सर्व गुणांना आठवत असतांना त्यांच्या महत्वाकांक्षी,
परिवर्तनवादी, आदर्षमाता, आदर्श गुरु या गुणांचा प्रामुख्याने व मुद्दाम उल्लेख करत आहे. या मागचे कारण आजच्या सर्वच माता-पित्यांना,भाव-भगिनींना त्यातून स्फूर्ती घेवून ती स्फूर्ती आपल्या लेकरांच्या कल्याणासाठी कारणी लावावी हीच एकमेव अपेक्षा. छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदीप्यमान इतिहास जगाला ज्ञात आहे. गेल्या तीनशे वर्षात जगातील प्रमुख योद्ध्यांचे आदर्शस्थान म्हणजे शिवराय. जगाला लोकशाहीप्रधान राज्य व्यवस्था देणारे शिवराय. समाजकारण, अर्थकारण, धर्मकारण, राजकारण, सांस्कृतीकीकरण, न्यायव्यवस्था, शिक्षण, भाषा असे एकही क्षेत्र नाही,की जेथे शिवरायांच्या कार्याचा ठसा नाही. मध्ययुगीन कालखंडातील जागतिक इतिहासातील सर्वगुण संपन्न एकमेव व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.शिवबास जन्म देण्यापासून ते त्यांना छत्रपती पदापर्यंत पोहचवणारी एकमेव व्यक्ती म्हणजेच शिवमाता-राजमाता-राष्ट्रमाता-जिजामाता होत्या.आपण मात्र महापुरुषांचे विचार स्मरणात आणत नाहीत ही दुर्दैवी बाब आहे.आपल्या साठी काय केले नाही असे एखादे उदाहरण दाखवा मग आपण मागे का आहोत याचे कारणे शोधणे गरजेचे आहे. जिजाऊँ ची शिकवण आणी आदर्श छत्रपती शिवाजी राजांनी घेतला, शिवाजी महाराजांचा आदर्श महात्मा ज्योतीबा फुलेंनी घेतला, महात्मा फुलेंचा आदर्श छत्रपती शाहु महाराजांनी घेतला, शाहु महाराजांचा आदर्श डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला हे सर्व असे चालत आलेले असतांना आपण का ? भरकटलो जातोय राष्ट्रमाता राजमाता जिजाउ मॉ साहेबांची शिकवण आणि या महापुरुषांचा आदर्श आपण का घेऊ शकत नाहीत ही एक शोकांतीकाच नव्हे काय.आपली तरुणाई वाम मार्गाला लागली आहे. आता हे थांबले पाहीजे तलवारी ऐवजी आता लेखणी घ्या. कुणी कलेक्टर, कुणी एसपी, कुणी तहसिलदार बना आणी आपल्या जिवणाचे सार्थक साधा. या महापुरूषांच्या विचारांचे आदर्श घेत जिजाऊ मातेची शिकवण जोपासा निश्चीतच यश मिळेले असा संदेशही व्याख्याते निलेश जगताप यांनी हजारों शिवप्रेमी नागरीकांना दिला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख विनायक मुळे, नगरपंचायत गटनेते शेषेराव जगताप, राकाँ तालुकाध्यक्ष दिनेश मस्के, शहर अध्यक्ष संतोष डावकर, भाजपा युवा नेते संजय आंधळे, रिपाई तालुका अध्यक्ष महादेव उजगरे,डॉ महादेव जाधव, डॉ महादेव नाईकनवरे ,नगरसेवक कचरू जाधव, दादासाहेब मुंडे, शहरप्रमुख नागेश डिगे, किसान सेेनेचे तालुकाप्रमुख बाबासाहेब चाटे, भाजपा तालुका अध्यक्ष रामेश्वर सावंत, रोहयो तालुका अध्यक्ष शिवाजी तौर, महीला आघाडी उपजिल्हाप्रमुख संगीता चव्हान, तालुकाप्रमुख प्रमीला माळी, नगरसेवक अस्लम कुरेशी,
तालुका उपप्रमुख रामदास ढगे, तालुका सचिव युवराज शिंदे, युवा सेना तालुकाप्रमुख बाळासाहेब लोकरे, तालुका उपप्रमुख युवराज रेडे, दिपक उजगरे, सर्जेराव जोगदंड, रा.काँ चे भास्कर ऊजगरे,अंबादास जाधव, जिजा लंगे, किसन माने ,हनुमंत शिदे , संजय धपाटे, भैय्या खोसे,रवी कांबळे,दिपक झाडे,वाचिष्ट शेडगे , महादेव शेळके, संतोष बादाडे, नवनाथ मोरे, क्रष्णा काळे, राहुल काळे, रामभाऊ सवासे, दत्ता सावंत, आणा राऊत, आणासाहेब शिंदे,मधुकर नागरगोजे,आशेक लोकरे, रामदास बादाडे, अंगद काळे, राहुल वाडरे, नरदे राठोड,सचिन धपाटे, महेश रासवे , बालु बादाडे, विनायक झाटे आदी शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...