‘विकिपीडिया- स्वस्थ ‘ द्वारे भारतीय भाषांतून आरोग्य ज्ञान :अभिषेक सूर्यवंशी

Date:

भारतीय भाषांतून आरोग्यविषयक ज्ञानासाठी  विकिपीडियाचा पुढाकार :’विकिपीडिया- स्वस्थ ‘ !
 ‘विकिपीडिया- स्वस्थ ‘ द्वारे भारतीय भाषांतून आरोग्य ज्ञान :अभिषेक सूर्यवंशी (संचालक,विकिपीडिया -स्वस्थ ) 
  विकिपीडिया च्या १९ व्या वर्धापनदिनी संचालक  अभिषेक सूर्यवंशी यांची माहिती.
पुणे :भारतीय भाषांतून आरोग्यविषयक अधिकाधिक लेखन,माहिती,ज्ञान इंटरनेटवर यावे यासाठी  विकिपीडियाने  ‘विकिपीडिया- स्वस्थ ‘ हा विशेष प्रकल्प  सुरु केला असून   ‘विकिपीडिया-स्वस्थ ‘ द्वारे भारतीय भाषांतून अधिक आरोग्य ज्ञान उपलब्ध करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत ,अशी माहिती अभिषेक सूर्यवंशी (प्रकल्प संचालक,विकिपीडिया -स्वस्थ)  यांनी आज पुण्यात पत्रकाद्वारे दिली.

‘विकिपीडिया’ च्या १९ व्या वर्धापन दिनी ही माहिती देण्यात आली . १५ जानेवारी हा ‘विकिपीडिया’ चा वर्धापन दिन आहे.’Special Wikipedia Awareness Scheme For The Healthcare Affiliates’ -SWASTHA ‘  असे या प्रकल्पाचे नाव आहे.

आताही आरोग्य विषयक लेखन, माहिती आणि ज्ञान इंटरनेट, विकिपीडियावर उपलब्ध आहे. त्याचे प्रमाण कमी आहे.भारतीय भाषांतून अधिकाधिक आरोग्य ज्ञान विकिपीडिया वर यावे ,यासाठी विशेष मोहिमेद्वारे ‘विकिपीडिया ‘ कम्म्युनिटी उत्तेजन देणार आहे. इंग्रजी बरोबरच भारतातील हिंदी ,मराठी,कन्नड ,मैथली ,उडिया ,तमिळ ,तेलुगू ,बंगाली ,गुजराती ,उर्दू  भाषांतून आरोग्यविषयक लेख ,माहिती विकिपीडिया वर आणण्यासाठी प्रयत्न घेतले जाणार आहेत. २०२१ पर्यंत ५०० मिलियन इंटरनेट यूजर्स स्थानिक भाषा वापरू लागतील असा गुगलचा अहवाल आहे. त्यात भारतीय भाषा आघाडीवर असणार आहेत. भारतीयांचा इंटरनेटवरील इंग्रजी पेक्षा स्थानिक भाषांतील माहितीवर अधिक भरवसा आहे.

अभिषेक सूर्यवंशी म्हणाले ,’गुगल द्वारे माहिती शोधताना विकिपीडिया वरची माहितीदेखील यूजर्सना दिली जात आहे. ही माहिती उपयोगात आणणाऱ्यांमध्ये भारतीय यूजर्स आघाडीवर आहेत.इंटरनेटवर शोध घेताना  भारतीय यूजर्स आरोग्यविषयक माहिती  अधिक मिळवताना दिसतात.त्यामुळेच आरोग्यविषयक माहितीचा साठा समृद्ध करण्याचा निर्णय विकिपीडियाने घेतला आहे. ही माहिती ज्ञान भारतीय परिस्थितीशी सुसंगत असले पाहिजे,याची काळजी घेतली जात आहे.

वैद्यकीय व्यावसायिक,डॉक्टर्स,वैद्यकीय महाविद्यालये,लेखक,पत्रकार,वाचक अशा सर्व स्तरातील यूजर्सना ‘विकिपीडिया -स्वस्थ ‘ वर माहिती ,ज्ञान विषयक साठ्यामध्ये लेखन योगदान देता येईल. त्यासाठी देशभर मोफत कार्यशाळा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी director@wikiswastha.org या ईमेल वर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यात अनेक भागात पूर्वमोसमी पावसाची हजेरी

गेवराईसह बीड तालुक्यात पडला वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस मुंबई :सोमवारी...

कुणाल कामराच्या माहीमच्या घरी पोलीस अन शोमधील प्रेक्षकांनाही पोलिसांच्या नोटिसा

मुंबई-एकीकडे मुबीत शिवसेना शिंदे गटाचे काहीजण कामरा याचे स्वागत...

जनसुरक्षा विधेयकामुळे लोकशाही मूल्यांवर निर्बंध; विधेयक रद्द करा : आप

जनसुरक्षा विधेयकामुळे सामान्य माणसाचा व संघटनांचा आवाज क्षीण होईल...