पुणे-सातारा महामार्गावरील (एनएच-4) खंबाटकी घाटातील नवीन सहा-पदरी बोगदा मार्च 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित

Date:

पुणे-सातारा महामार्गावरील (एनएच-4) खंबाटकी घाटातील नवीन सहापदरी बोगदा हा प्रत्येकी 3 मार्गिका असलेला दुहेरी बोगदा आहे. सध्या त्याचे बांधकाम प्रगतीपथावर असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटसंदेश मालिकेत दिली.  


सातारा-पुणे दिशेला असलेला सध्याचा ‘एस’ वळणमार्ग लवकरच पूर्ण होईल त्यामुळे अपघात जोखमीत मोठी घट होईल. 6.43 किमी लांबीच्या प्रकल्पासाठी एकूण भांडवली खर्च अंदाजे 926 कोटी रुपये आहे आणि मार्च 2023 पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे असे ते म्हणाले.


आपला देश आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पायाभूत सुविधांमधील अभूतपूर्व परिवर्तन अनुभवत आहे. संपर्क व्यवस्थेच्या माध्यमातून समृद्धी उलगडत आहे. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची मागणी नव भारत करत आहे असे गडकरी म्हणाले. बोगद्यामुळे संपर्क व्यवस्थेत सुधारणा होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रवाशांना त्यांच्या वेळ आणि पैशात बचतीद्वारे थेट लाभ प्रदान करेल असे त्यांनी सांगितले.पुणे-सातारा आणि सातारा-पुणे हा खंबाटकी घाटमार्गे अनुक्रमे 45 मिनिटे आणि 10-15 मिनिटांचा प्रवास वेळ आहे. हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर, या प्रवासाचा सरासरी वेळ कमी होऊन 5-10 मिनिटांवर येईल असे गडकरी यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींना धमकी देणाऱ्या राज आमेरावर कारवाईची मागणी: काँग्रेसचे निषेध आंदोलन

पुणे: शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बालगंधर्व चौकात निषेध...

आता २२ राज्यांमध्ये नागरिकत्व सिद्ध करावे लागणार,एसआयआर,बोगस मतदारांना वगळणार

पुणे (prab)- तब्बल २१ वर्षांनंतर नव्याने मतदार यादी तयार होणाऱ्...

पुण्यात एकाच वेळी मुळा, मुठा, खडकवासला धरणासह एकूण ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम

संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा सशक्त उपक्रम: ‘प्रोजेक्ट अमृत’चा...

भिवंडी महापौर निवडणुकीत बंडखोरी करणा-यांवर कारवाई:भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची घोषणा

भिवंडी: भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या पक्षादेशा (व्हीप) विरोधात...