Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

न्यू इंग्लिश स्कूलचे तारांगण झाले अधिक स्मार्ट;आधुनिक दुर्बिणींमुळे खगोलशास्त्राचा अभ्यास होणार ऑनलाइन

Date:

पुणे, ता. २ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोडच्या ६७ वर्षांपासून कार्यरत असलेल्या तारांगणात दोन आधुनिक दुर्बिणींच्या समावेश झाल्याने ते अधिक स्मार्ट झाले असून, आता खगोलशास्त्राचा ऑनलाइन अभ्यास करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

जगन्नाथ राठी व्होकेशनल गायडन्स अण्ड ट्रेनिंग इनस्टिट्यूटच्या (जेआरव्हीजीटीआय) वतीने या तारांगणात खगोलशास्त्राचे अभ्यासक्रम शिकविले जातात. आधुनिक दुर्बिणींमुळे ऑनलाइन अभ्यासाबरोबर अस्ट्रोफोटोग्राफी हा विषय सोप्या पद्धतीने शिकता येणार आहे. यासाठी डीएसएलआर कॅमेऱ्यामध्ये तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या तरंगलांबीसाठी तो वापरता येणार आहे. विशेषत: हायड्रोजन अल्फासाठी उपयुक्त ठरणार आहे. तेजोमेघाचे खरे रंग आणि आकाशगंगेच्या रचनेची छायाचित्रे मिळू शकणार आहेत.

दुसऱ्या दुर्बिणीला कोणताही स्मार्ट फोन वायरलेस जोडता येणार असून, आकाशातील तारे, ग्रह, तेजोमेघ, आकाशगंगा यांचे निरीक्षण करता येणार आहे. या दुर्बिणीच्या भिंगाचा व्यास ८० मिलिमीटरअसून नाभीय अंतर ५० सेंटीमीटर आहे. या दुर्बिणीचे मुख्य भिंग तीन भिंगांनी तयार केलेले आहे. त्यामुळे प्रकाशाचे कमीत कमी विकिरण होणार आहे. त्यामुळे शंभर टक्के अचूक प्रतिमा मिळणार आहेत. यामध्ये काचेचे कोणतेही दोष शिल्लक राहत नसल्याने, आकाशाचा खूप मोठा भाग बघता येणार आहे. दोन्ही दुर्बिणी स्वयंचलित  असून तारे, ग्रह यांच्या वेगाने फिरू शकणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना निरीक्षणात्मक माहिती संकलित करून तिचे विश्लेषण करता येणार आहे.

रमणबाग शाळेचे माजी विद्यार्थी उद्योजक प्रमोद चौधरी यांनी संस्थेला दिलेल्या देणगीतून नुकत्याच दुर्बिणी खरेदी करून तारांगणाला सुपूर्द करण्यात आल्या. शालेय स्तरावर खगोलशास्त्र विषय शिकविण्याची गरज आहे. तरच निरीक्षणात्मक माहिती संकलन आणि विश्लेषण करणारे विद्यार्थी तयार होतील असे मत शास्त्रज्ञ पराग महाजनी यांनी यावेळी व्यक्त केले. डीईसचे कार्यवाह धनंजय कुलकर्णी, जेआरव्हीजीटीआयचे संचालक प्रशांत गोखले, माध्यमिक शाळा समन्वय समितीच्या अध्यक्षा स्वाती जोगळेकर, आजीव सदस्या प्राजक्ता प्रधान, तारांगण प्रमुख विनायक रामदासी यांची प्रमुख उपस्थिती होती.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सदाशिव पेठेत रमेश डाईंग येथे टेरेसवर आग:परिसरात धुराचे साम्राज्य: वाहतुकीचा बट्ट्याबोळ

अग्निशमन दलाकडून चार अग्निशमन वाहने दाखल. आग विझवण्याचे काम...

शांतता पुणेकर वाचत आहेत मध्ये उद्यम विकास सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग

नागरिकांनी रोज रात्री झोपताना काहीतरी वाचण्याची सवय लावावी -...

महाराष्ट्रात थंडी वाढणार,पुढील 48 तास धोक्याचे

मुंबई- महाराष्ट्रात मुंबईसह उपनगरात गारठा वाढू लागला आहे. दुसरीकडे,...

राष्ट्रकुल संसदीय मंडळातर्फे (CPA) ५१ व्या संसदीय अभ्यासवर्गाचा भव्य शुभारंभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; विद्यार्थ्यांना राष्ट्रीय...