पुणे- ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड प्रशाले’तील इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. महेश नलावडे, तनया नलावडे आणि अद्वैत बंबोली प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाला समितीचे अध्यक्ष खेमराज रणपिसे अध्यक्षस्थानी होते. आत्मविश्वास, जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर यश निश्चित मिळते, असे मत बंबोली यांनी व्यक्त केले. ‘राष्ट्रीय छात्र सेने’च्या प्रावीण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापिका दर्शना कोरके यांनी प्रास्ताविक, पर्यवेक्षिका अनिता भोसले यांनी स्वागत, उपशाला प्रमुख सुधीर विसापुरे यांनी आभार आणि प्रवीण रांगोळे यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षक पालक संघाचे विशेष सहकार्य लाभले.
साकारणार फुलपाखरू उद्यान
‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड प्रशाले’तील गोल बागेत फुलपाखरू उद्यान निर्मिती प्रकल्पाला सुरुवात झाली. या बागेत फुलपाखरांना आकृष्ट करणार्या रोपांची लागवड करण्यात आली. बागेतील रोपांच्या शास्त्रीय नावांचे फलक लावण्यात आले. पुढीन दोन महिन्यांत फुलपाखरू उद्याण विकसित होईल, असा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. मुख्याध्यापिका दर्शना कोरके, फर्ग्युसनच्या पर्यावरण विभाग प्रमुख रूपाली गायकवाड, फुलपाखरांचे अभ्यासक रजत जोशी, पर्यावरण प्रमुख अवंती बाचीम यांचे विशेष सहकार्य लाभले.
![](https://mymarathi.net/wp-content/uploads/2022/07/1-1-1024x462.jpg)