नवी दिल्ली -नवीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनाचा आज 15 वा दिवस आहे. 6 राऊडच्या चर्चेनंतर शेतकऱ्यांना पटवून देण्याचा सरकारचा लेखी प्रयत्नही बुधवारी अपयशी ठरला. शेतकरी आता आंदोलन तीव्र करण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी म्हटले आहे की केवळ सरकारचा निषेध संपवण्यातच रस आहे. मात्र तिन्ही कायदे मागे घेतल्याशिवाय आंदोलन संपणार नाही. टिकैत यांनी किमान समर्थन मूल्य (MSP) वर स्वतंत्र विधेयक मागितले आहे.
‘सरकारला आंदोलन कमकुवत करायचे आहे’
देशभरातील शेतकरी महामार्गाला जाम करण्याची तयारी करीत आहेत. भारतीय शेतकरी संघटनेचे नेते मनजितसिंग म्हणाले आहेत की सरकारला आमचे आंदोलन कमकुवत करायचे आहे. पण, त्यात सहभागी होण्यासाठी बरेच शेतकरी दिल्ली येथे पोहोचत आहेत. आम्ही दिल्लीकरांना पाठिंबा देण्याचे आवाहन करत आहोत.
आज आंदोलन संपण्याचे आवाहन सरकार करणार आहे
न्यूज एजेंसीने सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर हे आंदोलन संपवून एकत्रित तोडगा काढण्यासाठी आज शेतकऱ्यांना आवाहन करतील. कृषीमंत्री पत्रकार परिषद घेतील.
केंद्रीय मंत्री म्हणाले- शेतकरी आंदोलनात चीन-पाकिस्तानचा हात
सरकार कायदा मागे न घेण्यावर ठाम असेल तर शेतकरीही ठाम आहेत. यावर मोठी मोठी वक्तव्य समोर येत आहे. केंद्रीय अन्नपुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, शेतकरी आंदोलनात पाकिस्तान आणि चीनचा हात आहे. दानवे म्हणाले की, CAA आणि NRC विषयी सर्वप्रथम मुस्लिमांना भडकवले. हे प्रयत्न अयशस्वी झाले तर आता शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. औरंगाबादमध्ये आरोग्य केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री यांनी बुधवारी हे वक्तव्य केले.

