पुणे- कोरोनामुळे दिवाळीला फटाके फोडण्यावर काहीसे बंधने घालण्यात आली होती. परंतु, असंख्य नागरिकांनी फटाके फोडलेच . दरवर्षीप्रमाणे यंदा ‘आवाज’ जरा कमीच होता. पण रात्री बारा नंतरही काही ठिकाणी सर्वत्र धूर धूर दिसत होता. परिणामी शहरातील पीएम २.५ ची पातळी दोनशेवर गेली होती. जी आरोग्यासाठी धोकादायक आहे.धनकवडी ,कात्रज ,शिवाजी नगर परिसरात हवेतील प्रदूषणाची पातळी धोकादायक होती , लक्ष्मी पूजन झाल्यावर आज दुसऱ्या दिवशी संध्याकाळीही काही अतिउत्साही फटाके फ्द्ताना दिसत होते, ऐकायला येत होते .मुख्यमंत्र्यांनी आवाहन करूनही पुण्यातून अशा पद्धतीने घेतलेला या आवाहनाचा समाचार निश्चितच चांगला नसल्याची ओरड होत होती मात्र त्यावर कारवाई करायला कोणी पुढे येत नव्हते .
लॉकडाऊनमुळे हवेची पातळी धोकादायकवरून चांगली या स्थितीवर आली होती. अनलॉकनंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती झाली. त्यात दिवाळीत फटाके फोडल्याने ती धोकादायक बनली. प्रदूषणामुळे विविध आजारांचा त्रास होतो. कोरोनामुळे दिवाळीत फटाके फोडणे अत्यंत धोकादायक असल्याची जनजागृती फुप्फुसविकारतज्ज्ञ यांनी केली होती. त्याबाबतचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. ज्यांना फुप्फुसाचा, हृदयाचा आजार आहे, अस्थमा, ब्लडप्रेशर आहे, त्यांना या फटाक्यांच्या धुराने अधिक त्रास होऊ शकतो.
प्रदूषणाचा शरीरावर काय परिणाम होऊ शकतो
शहरात कार्बन डायऑक्साइड, धुलिकण, बॅक्टेरिया, विषाणू, विविध परागकण आपण श्वासाद्वारे शरीरात घेत असतो. जे आपल्या शरीराला हानी पोचवतात. यामुळे हृदयावर परिणाम होऊन हायपरटेंशन, हृदयाचे आजार, हृदय बंद पडणे असा धोका असतो. फुप्फुसांना इन्फेक्शन, विसराळूपणा, अस्थमा, फुप्फुसाचा कॅन्सर, स्ट्रोक, अल्झायमर असे आजार होऊ शकतात.
पीएम २.५ हवेची पातळी
० ते ५० : उत्तम
५० ते १०० : समाधानकारक
१०० ते २०० : धोकादायक
२०० ते ३०० : अत्यंत धोकादायक
शिवाजीनगर :२००
कात्रज : १३५
हडपसर : १०२
भूमकर चौक : १३२
भोसरी : १०२
पाषाण : ८४

