बॅकस्टेज कलाकारांचा विमा उतरविण्यासाठी राष्ट्रवादीचा ५ लाखाचा चेक सुनील महाजनांकडे ..

Date:

पुणे : कोरोना महामारीमुळे अनेक संकटांचा तडाखा बसलेल्या चित्रपटसृष्टी व नाट्यसृष्टीतील बॅकस्टेज कलाकारांचा प्रत्येकी पाच लाख रुपयांचा विमा उतरविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बॅकस्टेज कलाकारांचा विमा उतरविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पुणे संवादचे अध्यक्ष सुनील महाजन यांच्याकडे पाच लाख रुपयांचा धनादेश शुक्रवारी सुपूर्द केला.

यासंदर्भात प्रशांत जगताप यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि,’सध्या चित्रपटनिर्मिती आणि नाट्यप्रयोग बंद असल्यामुळे चित्रपटसृष्टी व नाट्यसृष्टीला अनेक संकटांचा तडाखा बसला आहे. त्यातही, नेपथ्य, प्रकाशयोजना, मेकअप आदी जबाबदारी सांभाळणाऱ्या बॅकस्टेज कलाकारांचे जगणे मुश्कील झाले आहे. अनेकांपुढे रोजी-रोटीचा प्रश्न आहे. कोरोनासारखा आजार झाल्यास उपचारासाठीही पैसे नाहीत, अशी अनेकांची स्थिती आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन या बॅकस्टेज कलाकारांना किमान आरोग्योपचाराची हमी मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेत या कलाकारांचा प्रत्येकी पाच लाख रुपयांचा विमा उतरविण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उपलब्ध करून दिलेल्या निधीतून संवाद पुणेचे सुनील महाजन यांच्याकडे विम्याचा पहिल्या वर्षीचा हप्ता भरण्यासाठी पाच लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसने सदैव कष्टकरी समाजासाठी, असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी पुढाकार घेतला आहे. यापुढेही आम्ही सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत राहू, असा विश्वास देतो.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हुंडाविरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी व जिल्हास्तरावर विशेष पथके तैनात करा- डॉ. गोऱ्हे

बुलढाणा-बाणेर येथील विवाहितांच्या आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशी व कठोर...

१० लाख रुपयांची X रे मशीन ६१ लाखांना खरेदी केली-आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या काळात गैरव्यवहार :मनसे

मुंबई-महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी...

४ वर्षेच का मुंबई महापालिका अर्थकारणाची २५ वर्षाची चौकशी होऊ द्यात -भाजप आमदार अमित साटम

मुंबई मनपा चौकशीवरून भाजप-सपा आमने-सामनेमुंबई- महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विधानसभा...

महापालिकेत कंत्राटदार-दलालांचे वर्चस्व- आमदार रईस शेख

मुंबई-समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी मुंबई महानगरपालिकेतील (BMC)...