पुणे :
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हिराबाग, टिळक रोड येथील पक्ष कार्यालयात शहीद दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या प्रतिमांना पुणे शहर डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.दत्तात्रय गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सलाम करण्यात आला. यावेळी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अशोक राठी, शंकर शिंदे, विनायक चाचर, मनाली भिलारे, योगेश वराडे, संजय गाडे, सुरेश पवार, अशोक माने आदी उपस्थित होते.


