पुणे :
राष्ट्रवादी शहर युवक कॉंग्रेसच्या शहराध्यक्षपदी राकेश कामठे यांची शुक्रवारी निवड करण्यात आली. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी कामठे यांची निवड केली.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते कामठे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे उपस्थित होते. अजित बाबर यांचे मार्च 2016 मध्ये निधन झाल्यानंतर, युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्षपद रिक्त झाले होते.

