पुणे :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष साहित्य, कला व सांस्कृतिक विभाग प्रभाग क्र. 35 च्या वतीने ‘दुर्मिळ विमानांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन प्रेक्षणीय आणि वाचनीय असून, डॉ. श्यामा प्रसाद उद्यानासमोर, पटवर्धन बाग, एरंडवणा पुणे येथे शनिवार दि. 30 व 31 जानेवारी 2016 रोजी सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
या प्रदर्शनाचे उदघाटन 30 जानेवारी रोजी ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार अॅड वंदना चव्हाण, लक्ष्मीकांत खाबिया, दीपक मानकर, अंकुश काकडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती प्रदर्शनाचे आयोजक चैतन्य उर्फ सनी मानकर (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष साहित्य, कला व सांस्कृतिक विभाग पुणे शहर अध्यक्ष) यांनी दिली.
या प्रदर्शनामध्ये रबर पॉवर्ड, स्टॅक प्ले, क्वाडकॉप्टर, जेट विमाने अशा विविध प्रकारची दुर्मिळ विमाने पाहण्याची संधी मिळणार आहे. दोन फुटांपासून सात फुटापर्यंतच्या विमानांच्या प्रतिकृती या प्रदर्शनात बघायला मिळणार आहेत. हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत आहे.
उद्घाटन : दिनांक 30 जानेवारी 2016, सायंकाळी 4.00 वाजता
वार : शनिवार
उद्घाटन हस्ते : ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या हस्ते
प्रमुख उपस्थिती : खासदार अॅड वंदना चव्हाण, लक्ष्मीकांत खाबिया, दीपक मानकर, अंकुश काकडे
उद्घाटन स्थळ : डॉ. शामाप्रसाद मुखर्जी उद्यानासमोर, पटवर्धन बाग, एरंडवणे, पुणे
प्रदर्शन दिनांक व वेळ: 30 जानेवारी व 31 जानेवारी रोजी सायंकाळी 4 ते रात्री 10 पर्यंत



