पुणे- महापालिकेतील गेल्या ५ वर्षातील स्थायी समितीच्या भ्रष्टाचारी वाटचाली च्या विक्रमाविरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस उद्या दिनांक २८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता महापालिकेच्या प्रवेश द्वारात आंदोलन करणार आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रसिद्धी प्रमुख अमोघ ढमाले यांच्या मार्फत पाठविली आहे. अवघे १२५ सिग्नल च्या देखभाली साठी ५८ कोटी रुपयांचे टेंडर स्थायी समिती अध्यक्षांनी मंजूर करवून घेतल्याने आणि पुढील ५ वर्षांची आपली सोय अशाच विविध टेंडर द्वारे करवून घेतल्याने भार्ष्टचारातील माहीर अशी यांची इतिहासातील ख्याती होणार असून , अशा प्रवृत्ती विरोधात प्रखरतेने आवाज उठवणे गरजेचे आहे म्हणून हे आंदोलन करण्यात येते आहे असे त्यांनी म्हटले आहे. खरोखर प्रामाणिक पणे काम करण्याची इडी ची इछ्या असेल तर पुण्यातील स्थायी समिती अध्यक्षांची चौकशी करवून हा सूर्य तो जयद्रथ हे स्पष्ट करून इडी ने दाखवावे असे आवाहन हि याबरोबर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करत आहेत .
स्थायी समितीच्या भ्रष्टाचाराच्या विक्रमी वाटचाली विरोधात राष्ट्रवादी आक्रमक – आंदोलन करणार-सर्वांनी उपस्थित राहा -अध्यक्षांचे आवाहन
Date:

