पुणे- राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून सूडबुद्धीने अनेकांवर कारवाई होत आहे. या सत्कार समारंभास संबोधित करतांना मलिक म्हणाले की,” सरकारच्या स्थापनेपासून भाजप कडून हेतुपुरस्सर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बदनामी व खोटे आरोप करत प्रतिमा मलिन करण्याचे कटकारस्थान सुरू असून यां सर्व यंत्रणांना उघडे पडण्याचे काम पवार साहेबांचा शिलेदार म्हणून मी पार पाडतो आहे . या लढाईमध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांची भूमिका व प्रेम मला प्रेरणादायी आहे. महाविकास आघाडीच्या वतीने माझा जो सम्मान केला त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.”
नवाबमलिक आक्रमक भूमिका घेत भाजपला सडेतोड उत्तर देत आहेत. महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना यामुळे लढण्याची ऊर्जा मिळत आहे अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.या सत्कार सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप,विरोधी पक्षनेत्या सौ.दिपालीताई धुमाळ,शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे,गजानन थरकुडे, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अभय छाजेड,माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, आमदार चेतन तुपे,जेष्ठनेते अंकुश काकडे, आदिंसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा सत्कार
Date:

