पुणे-
ससून रुग्णालयामध्ये कोविड रुग्णांसाठी नव्याने ४०० बेड तयार करण्यात येत आहे त्यासाठी नव्याने ३५० नर्सेसची भरती करण्यात आलेली आहे. त्यांच्या ३ वेळेच्या जेवणाची व्यवस्था करावी अशी अपेक्षा ससून रुग्णालयाने व्यक्त केली होती.
‘प्रशांत जगताप मित्र परिवाराच्या’ वतीने रुग्णालयाला ३५० नर्सेसच्या पुढील ६० दिवसाच्या जेवणाच्या व्यवस्थेकरिता ५,००,०००/- (पाच लाख रुपये फक्त) चा धनादेश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘कौन्सिल हॉल पुणे’ येथे देण्यात आला.
याप्रसंगी ससून रुग्णालयाचे डीन डॉ.श्री. मुरलीधर तांबे, अधिक्षक डॉ. श्री. अजय तावरे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रशांत जगताप मित्र परिवाराच्या वतीने दिलेल्या देणगीतून पुढील ६० दिवसाची ३ वेळेच्या जेवणाची ३५० नर्सेसची व्यवस्था होणार आहे.
माजी महापौर प्रशांत जगताप यांनी केली 350 नर्सेसच्या 2 महिन्याच्या भोजनाची व्यवस्था
Date:

