पुणे- सीमेवर रोज जवान शहीद होणे, रोज गावागावात शहीदांवर अश्रू ढाळण्याची वेळ येणे हे कशाचे लक्षण आहे ? कोणाची चूक आहे .. सीमेवर चे वातावरण हवे कसे ? असे सवाल करीत आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर टीका केली .
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचाराचा शुभारंभ झाला. प्रचार सभा अण्णा भाऊ साठे पुतळा, सारसबाग येथे आज सोमवारी सायंकाळी झाली त्यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.. यावेळी खा. वंदना चव्हाण, अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, प्रशांत जगताप, बाळासाहेब बोडके , वैशाली बनकर, अनेक पदाधिकारी, विविध सेल अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष उपस्थित होते.