महिला सुरक्षिततेची काळजी घ्या: खा.अॅड.वंदना चव्हाण
आय टी इंजिनिअर तरुणीच्या हत्येचा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध
पुणे: हिंजवडीयेथील आय टी कंपनीमधील सॉफ्टवेअर इंजिनिअर रसिला राजू ओपीच्या कंपनीच्या सुरक्षारक्षकाने केलेल्या निर्घृण खून प्रकरणाबाबत पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसशहराध्यक्ष, खा.अॅड.वंदना चव्हाण याबाबत प्रतिक्रिया देताना
म्हणाल्या अंगावर शहरा आणणाऱ्या या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे .अनेक उपाय योजना करून देखील महिला सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. तरी शहरातील वाढ
त्या अत्याचारांबाबत योग्य ती कारवाई आणि महिलांसाठीच्या ‘सेफ्टी ऑडिट ‘ उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.कार्यालयीन ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ, शोषण रोखण्यासाठी ‘सेक्युअल हॅरॅसमेंट ऑफ वूमन अॅट वर्क प्लेस’ (प्रिव्हेंन्शन, प्रोहिबिशन, रिड्रेसल) अॅक्ट 2013 लागू झाला आहे. परंतु या कायद्याची माहिती महिला आणि विद्यार्थीनींपर्यंत अधिकाधिक पोहोचविणे आवश्यक आहे. अॅक्टनुसार प्रत्येक आस्थापनेमध्ये एक समिती, इंटर्नल कम्प्लेंट कमिटी या नावाने स्थापन केली पाहिजे. त्यांची नावे दर्शनी भागात फलकावर लावणे अनिवार्य आहे, परंतु तशी अंमलबजावणी अद्यापही झालेली दिसत नाही.
संबंधित कंपनी आणि सर्व शासकीय ,निमशासकीय स्तरावर या समितीची स्थापना झाली आहे का ,आणि त्या समितीपर्यंत गेलेल्या तक्रारींचा आढावा घेण्याची गरज आहे
या प्रकरणानंतर या क्षेत्रासह इतर क्षेत्रामध्ये महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरातील महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा लक्षात घेऊन त्याप्रमाणे ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. शहरात शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने अनेक विद्यार्थिनी व महिला काम करीत असतात. अशाप्रसंगी त्यांना कामाच्या
ठिकाणी येणार्या समस्यांबाबत उपाययोजना करणे प्रशासनाची जबाबदारी आहे.मुलींवर होणारे अत्याचार हे माणुसकीला काळीमा फासणारे असून, त्यातून होणार्या हत्या, महाविद्यालयीन तरूणींची छेडछाड अशा घटना राज्यात वाढत आहेत. राज्यातील कायदा सुव्यवस्था कमालीची ढासळली आहे,
असे या प्रकरणावरून दिसून येते. तरी राज्य सरकारने याबाबत लवकरात लवकर कारवाई करावी.