“राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षा’च्या 17 व्या “वर्धापनदिनानिमित्त पर्वती गावात एलईडी बल्बचे वितरण
पुणे :
“राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षा’च्या 17 व्या वर्धापन दिनानिमित पर्वती गावात एल.ई.डी. बल्बचे वितरण करण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यालय सचिव संजय गाडे यांच्या हस्ते या बल्बचे वाटप दिनांक 10 जूनपासून 13 जून 2016 पर्यंत पर्वती गावात करण्यात येणार आहे. पाच व्हॅट, सात व्हॅॅट आणि नऊ व्हॅट, बारा व्हॅट विक्रीला असून, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कार्यक्रमाचे संयोजन लक्ष्मी शिंदे, श्रीकांत मेमाणे यांनी केले. यावेळी अंबोले, तळेकर, अनिल जोरी, अविनाश वेल्हाळ उपस्थित होते.