पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
पुणे:
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. आज हिराबाग येथील पक्ष कार्यालयामध्ये खासदार, शहराध्यक्ष अॅड.वंदना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शिल्पा भोसले (पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष) यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी शंकर शिंदे, प्रा. अविनाश ताकवले यांची भाषणे झाली.
अतूल तरवडे, सुरेश बांदल, मच्छिंद्र उत्तेकर, अॅड.औदुंबर खुने-पाटील, अमोल शेळके, शांतीलाल मिसाळ, नितीन सोनावणे, शुभम शिंदे, विक्रम मोरे, अजिंक्य पालकर, शाम ढावरे, दादासाहेब सांगळे, विलास ठुबे, योगेश वराडे, संजय गाडे, अविनाश वेल्हाळ उपस्थित होते.