यावेळी स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, माजी आमदार कमलनानी ढोले – पाटील, कृष्णकांत कुदळे, पुणे शहर हजारी प्रमुख व्यवस्थेच्या समन्वयक शिल्पा भोसले, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, शंकर शिंदे, औदुंबर खुने – पाटील, रजनी पाचंगे, हजारी प्रमुख व्यवस्थेतील कार्यकर्ते उपस्थित होते.
शहराध्यक्ष, खासदार अॅड. वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शन खाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी खासदार आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांचा संदेश हजारी प्रमुखांना वाचून दाखविण्यात आला. ‘हजारी प्रमुखांनी प्रभागात सुसंवाद ठेवावा. दैनंदिन संवादातून आत्मविश्वास ,नम्रतेने आणि संयमपूर्वक ‘बूथ लेव्हल’ चे कार्य अचूक करावे. विजय हेच अंतिम लक्ष्य असून ते निश्चित गाठावे ‘ असे त्यांनी या संदेशात म्हटले आहे.