अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक कचेरीचे उदघाटन
पुणे
‘वॉर रूम’ नाही आम्ही ‘कंट्रोल रूम’ चे उदघाटन केले. आम्हाला काही लढाई करायची नाही, पण जातीयवादी पक्षांचा पराभव करायचा आहे, तेव्हा कंट्रोल रूमचे उदघाटन केले असे जाहीर करतॊ. सोशल मीडियाचा वापर वाढतआहे त्यासाठी या निवडणूक कचेरीमध्ये बसून आमचे सहकारी काम करतील, त्यासाठी या कंट्रोल रूमचा उपयोग होईल.
‘जातीयवादी पक्षाचा पराभव करण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र आले पाहिजे. याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार पुण्याच्या शहराध्यक्ष यांना दिले आहेत तसेच जिल्हा पातळीवर जिल्हाप्रमुखांना दिले आहेत’, असे पुणे महानगरपालिका निवडणुक २०१७ च्या पार्श्वभूमीवर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक कचेरीच्या उदघाटन प्रसंगी आज सकाळी सेंट्रल पार्क येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक कचेरीचे उदघाटन आज सकाळी सेंट्रल पार्क (ऑफ जंगली महाराज रोड) येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले’ निवडणुकीच्या याचसंहितेचे तंतोतंत पालन करून फॉर्म भरायचे आहेत. यावेळची प्रक्रिया ही वेगळी असून ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाने जाहीरनामा प्रकाशित केला त्यामध्ये आम्ही पुणे शहराबाबतचे व्हिजन त्यामध्ये स्पष्ट केले आहे. पुणेकरांनी टाकलेल्या विश्वासाला तडा न जाता आम्ही एकहाती सत्ता नसतानाही काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाला पूर्ण बहुमत मिळावे यासाठी पुणेकर नागरिकांना आवाहन करतो आणि पुण्याचा कायापालट आम्ही करू असा विश्वास मी देतो.
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना अजित पवार म्हणाले, ‘आघाडीचा निर्णय हा युतीवर अवलंबून नाही सन्मानपूर्वक जागा वाटप झाले तरच आघाडी होऊ शकते. नोटबंदीबाबत बोलताना ते म्हणाले, पन्नास दिवस नागरिकांनी सहन केले, आज सत्तर दिवस झाले अजूनही परिस्थितीत सुधारणा नाही ग्रामीण भागातील नाग्रीकांची परिस्थिती अवघड आहे. शहरातदेखील अनेक समस्या आहेत. सवाशे कोटी लोकांना अडचणीत आणणारा हा निर्णय आहे .
सेंट्रल पार्कमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक कचेरीला माळी नगर शुगर फॅक्टरी, कृष्णकांत कुदळे यांनी जागा उपलब्ध करून दिली आहे. या कार्यक्रमाला पुणे शहर अध्यक्ष वंदना चव्हाण, महापौर प्रशांत जगताप, बाळासाहेब बोडके, नगरसेवक रवींद्र माळवदकर, अंकुश काकडे, अशोक राठी, आमदार जयदेव गायकवाड, आमदार अनिल भोसले, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या कार्यक्रमात शिवसेना आणि काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामध्ये माजी उपमहापौर आणि काँग्रेसचे नगरसेवक बंडू उर्फ सुनील गायकवाड, बागवान समाजचे अध्यक्ष अब्दुल बागवान, कोंढवा शिवसेना शाखा प्रमुख इम्रान शेख, सामाजिक कार्यकर्ते नवाज नागरिया, इम्तियाझ शेख, अन्वर मेमन, इब्राहिम शेख, राऊत कुरेशी आणि अय्याज खान यांचा समावेश होता